Subscribe Us

header ads

अभ्यासातील सातत्य यशाचा सक्सेस पासवर्ड;जागतिक महिला दिन : पोलीस उपनिरीक्षक मनिषा लटपटे यांचे प्रतिपादन

बीड स्पीड न्यूज 


अभ्यासातील सातत्य यशाचा सक्सेस पासवर्ड

जागतिक महिला दिन : पोलीस उपनिरीक्षक मनिषा लटपटे यांचे प्रतिपादन


बीड / प्रतिनिधी_प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये यश मिळविण्याची क्षमता असते आपल्या अभ्यासात सातत्य ठेवले तर यश नक्कीच मिळते. असे प्रतिपादन  महिला तक्रार निवारण केंद्राच्या पोलीस उपनिरीक्षक मनिषा लटपटे यांनी व्यक्त केले. शहरातील सावंत प्लाझा, मित्र नगर चौकाजवळ शिवाजी नगर बीड येथे  बार्टी मार्फत सुरु असलेल्या सम्राट प्रतिष्ठान संचलित छत्रपती राजर्षी शाहू स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र येथे जागतिक महिला दिनानिमित्त मंगळवार (ता. ८) आयोजित कार्यक्रमात मनिषा लटपटे बोलत होत्या.पुढे बोलताना मनिषा लटपटे म्हणाल्या की,  महिलांनी त्यांच्या न्याय आणि हक्कांसाठी लढा उभा केला होता. त्या लढ्याचा इतिहास प्रेरणा देत राहावा, म्हणून  महिलांच्या सन्मानार्थ आपण जागतिक महिला दिन साजरा करतो. तुम्ही सगळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी आहात. त्यामुळे  अभ्यासात सातत्य ठेवले तर कोणत्याही परीक्षेत यश मिळविणे अवघड नाही. अगदी सर्वसामान्य विद्यार्थी सुध्दा युपीएससी एमपीएससी परीक्षेत यश मिळवू शकतो. प्रत्येक विद्यार्थ्यांने अभ्यासात सातत्य ठेवून पूर्ण कार्यक्षमतेने प्रयत्न करावेत आणि एखाद्या आयटी कंपनीत काम करण्यापेक्षा शिक्षक, प्राध्यापक, शासकीय कर्मचारी, प्रशासकीय अधिकारी बनून देशसेवा करावी. खडतर प्रवासातून निघालेली पायवाट एक ना एक दिवस तुम्हाला यशापर्यंत घेऊन नक्कीच जाते. त्यामुळे अपयश आले म्हणून थांबू नका पुन्हा तयारी करा आणि यशस्वी होऊन आपल्या आईवडिलांचे नाव रोशन करा.  या जगात वावरताना खासकरून मुलींनी निडर आणि धाडसी असले पाहिजे. मुलींनो शिक्षण अर्ध्यावर सोडू नका त्याने, आयुष्याचे मात्रे होते. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून मोठ्या पदाची नोकरी मिळवून स्वाभिमानाने जगायला शिका. कारण त्याची आज  नितांत गजर आहे. असं मनोगत मनिषा लटपटे यांनी व्यक्त केले. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून कवयित्री प्रा. कावेरीताई खुरणे, प्रमुख मार्गदर्शक पोलीस उपनिरीक्षक मीना तुपे, सम्राट प्रतिष्ठान संचलित छत्रपती राजर्षी शाहू स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे संचालक राहुल वाघमारे, अध्यक्षा छायाताई काकडे,  विशेष उपस्थिती म्हणून डॉ. जयाताई रायमुले, करुणाताई  वाडमारे, शुभांगीताई भूइटे, शोभाताई सावंत, पोलीस महिला कर्मचारी अनिता खरमाटे, दिपाली सावंत, आदी महिला मान्यवर उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.अंबिका शिंदे  यांनी केले. सूत्रसंचलन  सुनिल डोंगरे, निशा वीर यांनी केले. तर आभार राज काळे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सम्राट प्रतिष्ठान संचलित राजर्षी शाहू स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्राचे केंद्र प्रमुख यशवंत वावळकर, सहाय्यक केंद्र प्रमुख प्रा.अविनाश वडमारे, प्रा. शिवाजी रुपनर, प्रा. बाबासाहेब चौरे, प्रा. भरत खेत्रे, ग्रंथपाल सचिन काकडे, सहाय्यक ग्रंथपाल अनिल डोंगरे, कार्यालयीन कर्मचारी विनोद जोगदंड, रविकिरण जाधव, राहुल शिंदे, दिपालीताई निर्मळ, दिपक वाघमारे यांनी परिश्रम घेतले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा