Subscribe Us

header ads

धारूर घाटात सिमेंटचा ट्रक पलटी चालक ठार


बीड स्पीड न्यूज 


धारूर घाटात सिमेंटचा ट्रक पलटी चालक ठार

धारूर_ धारूर येथील अरुंद अवघड घाटाने आज पुन्हा एकाचा बळी घेतला. उस्मानाबाद कडून माजलगावकडे सिमेंट घेऊन निघालेला ट्रक (MH. 25 P 9547) घाटातील अवघड वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने पलटी झाली.या अपघातात ट्रकमध्ये चिरडून चालक मुस्तफा उमपुरे ( वय 32 रा. उमरगा) हा गंभीर जखमी झाला. मुस्तफाला जखमी अत्यवस्थ धारूर येथील शासकीय रुग्णालयाच्या 108 रुग्णवाहिकेचे डॉ. अरविंद निकते आणि पायलट अमर मुंडे यांनी तातडीने अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु वाटेतच मुस्तफाचा मृत्यू झाला. दरम्यान, वारंवार होणाऱ्या अपघातात अनेकांना जीव गमवावा लागला आहे. घाटाचे रुंदीकरण करण्यात यावे अशी मागणी अनेक दिवसापासून होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा