Subscribe Us

header ads

अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार; आरोपीस दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा

बीड स्पीड न्यूज 


अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार; आरोपीस दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा



अंबाजोगाई_अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून नेवून तिच्यावर वारंवार बलात्कार केला. सदर प्रकरणात अप्पर सत्र न्यायाधीश एस. एस. सापटणेकर यांनी आरोपीला दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा आणि पाच हजार रुपये दंडची शिक्षा ठोठावली आहे.या प्रकरणातील आरोपी अशोक मारुती सरवदे, (रा. साबळा, ता. केज) याने अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून फुस लावून पळवून नेले व सदर आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. त्यानुसार आरोपीस सदरचे प्रकरणात मा. न्यायालयाने जामीन दिला असता व जामीनवर सुटल्यावर सदर आरोपीने परत पुन्हा पिडीतेस फोन करून लग्नाचे आमिष दाखवून पळवून घेवून गेला अल्पवयीन आहे. हे माहिती असताना सुध्दा अनेकवेळा बलात्कार केला. विशेष बाब म्हणजे सदर आरोपी हा विवाहीत असून त्याला दोन मुले आहेत. तरी देखील सदर अल्पवयीन पिडीतेस साबळा, ता. केज येथून पळवून नेले व अनेकवेळा बलात्कार केला. सदर फिर्यादीवरून २८ सप्टेंबर रोजी गुन्हा नोंद करून दोषारोप पत्र मा. न्यायालयात सादर करण्यात आले. सदर प्रकरण हे आरोपीस तुरूंगात ठेवूनच चालविण्यात आले.सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे सहा साक्षीदार तपासण्यात आले व मा. न्यायालयाने सदर साक्षीपुरावा व सरकारी वकीलाचा युक्तीवाद ग्राहय धरून आरोपीस दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा आणि पाच हजार रुपये दंड ठोठावला. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अॅड. अशोक कुलकर्णी यांनी काम पाहीले व त्यांना अॅड. आर. एम. ढेले, व अॅड. नितीन पुजदेकर यांनी मदत केली व तसेच पोलीस पैरवी म्हणून पो. कॉ. बाबुराव सोडगीर व पो.हे. कॉ. शिवाजी सोनटक्के यांनी काम पहिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा