Subscribe Us

header ads

आ.संदीप क्षीरसागर व अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली गुंधावडगाव सेवा सहकारी सोसायटी राष्ट्रवादीच्या ताब्यात

बीड स्पीड न्यूज 


आ.संदीप क्षीरसागर व अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली गुंधावडगाव सेवा सहकारी सोसायटी राष्ट्रवादीच्या ताब्यात


बीड (प्रतिनिधी):- गेवराई मतदार संघात असलेल्या गुंधावडगाव येथील सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणूकीत आ.संदीप क्षीरसागर व माजी आ.अमरसिंह पंडित आणि  यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्षाचा पॅनल बिनविरोध निवडून आला आहे.बीड तालुक्यातील,गेवराई मतदार संघात असलेल्या गुंधावडगाव सेवा सहकारी सोसायटीची निवडणूकीत विरोधकांचे एकही फॉर्म दाखल न झाल्याने गुंधावडगाव सेवा सहकारी सोसायटी,आ.संदीप क्षीरसागर व माजी आ.अमरसिंह पंडित व  यांच्या कुशल नेतृत्वाखाली राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाच्या ताब्यात बिनविरोध आली आहे.या अनुषंगाने भगवान गव्हाणे, अनिल (देवा)कुलकर्णी, दिलीप खांडे, दिपक (काका) कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली वैजनाथ नागरगोजे यांची चेअरमनपदी तर अशोक जामकर यांची व्हा.चेअरमनपदी निवड करण्यात आली असून अशोक गव्हाणे, वैजनाथ गव्हाणे, मारोती नागरगोजे, नंदाबाई जामकर, बिरूणदास नागरगोजे, भाऊसाहेब घुगे, सुनिल नागरगोजे, अर्जुन लांडगे आदींची सदस्यपदी निवड झाली आहे. सर्व निवडून आलेल्या उमेदवारांना आ.संदीप क्षीरसागर माजी व माजी आ.अमरसिंह पंडित   यांनी पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा