Subscribe Us

header ads

बीड तालुक्यातील मुळुख वाडी येथे भरदिवसा घरफोडी चार लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास

 बीड स्पीड न्यूज 

प्रतिनिधी नवनाथ गोरे

बीड तालुक्यातील मुळुख वाडी येथे भरदिवसा घरफोडी
चार लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास

वाकनाथपुर प्रतिनिधी_बीड जिल्हात गुन्हेगारी काय कमी होत नाही दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालली आहे रोज चोरी च्या कित्येक घटना घडत आहेत.आज दिनांक १४ मार्च वार सोमवार रोजी लिंबा गणेश च्या जवळ असणारे 

मुळूक गावात दुपारी पाच ५ वाजण्याच्या दरम्यान चोरीची घटना घडली आहे. मुळुक गावच्या रोड लागत असणारे सखाराम ढास यांचे घर आणि शेत आहे घरातील सर्व मंडळी शेतात गेले असता अज्ञात चोरट्याने घरात घुसून 

नगद पन्नास हजार रुपये आणि  सोने असा अंदाजे चार लाख पन्नास हजार  रुपये किमतीचा मुद्देमाल घेऊन चोरट्याने पलायन केले शेतातील अनिता केशव ढास या चहा बनवण्यासाठी घरी आल्यानंतर घराचे कुलूप 

तोडलेले दिसले ही बाब लक्षात आल्याने एकाच खळबळ उडाली घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी लिंबा गणेश पोलीस आणि नेकनुर पोलीस ठाण्याचे एपीआय शेख मुस्तफा घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच श्वानपथकाला पाचारण करण्यात आले असुन फिंगर प्रिंट एक्सपर्ट ही पोहचले आहेत. पोलीस घटनेची पाहणी करत आहेत.घटनास्थळी सामजिक कार्यकर्ते गणेश ढवळे ही उपस्थित झाले पुढील तपास पोलीस करत आहेत. दिवसा चोरी झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा