Subscribe Us

header ads

बीड बसस्थानकात बसमध्ये प्रवाशाची आत्महत्या

बीड स्पीड न्यूज 

बीड बसस्थानकात बसमध्ये प्रवाशाची आत्महत्या

बीड प्रतिनिधी_ आज बीड बसस्थानकामध्ये एका प्रवाशाने आत्महत्या केल्याची घटना घडली असून या घटनेमुळे त्या प्रवाशाने नेमकी कशामुळे आत्महत्या केली हे मात्र अद्यापही स्पष्ट झाले नाही. घटनेची माहिती कळताच शिवाजीनगर पोलिस घटनास्थळी येऊन सदरील मृतदेहाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.शहरातील शाहूनगर भागामध्ये राहत असलेले निवृत्ती भागुजी आबुज (वय ६०) यांनी एस.टी. बस (क्र.एम.एच.१४ बीटी-२२३७) मध्ये अँगलला दोरी बांधून आत्महत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणाची पोलिसांना झाल्यानंतर त्यांनी तात्काळ माहिती बसस्थानकातील पोलिसांना कळविले. त्यानंतर सदरील इसमाचा मृतदेह पंचनामा करून जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला असून नेमकी आत्महत्या कशामुळे केली हे मात्र समजू शकले नाही. सदरील घटनेची माहिती कळताच आबुज यांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा