Subscribe Us

header ads

बाईक आडवी लावून तिघांनी मारहाण करीत ट्रक चालकाचे अडीच लाख लुटले

बीड स्पीड न्यूज 


बाईक आडवी लावून तिघांनी मारहाण करीत ट्रक चालकाचे अडीच लाख लुटले

माजलगाव_ रस्त्यात बाईक आडवी लावून ट्रक चालकाला कोयता अन चाकुचा धाक दाखवत मारहाण करून दोन लाख पन्नास हजार रूपये आणि मोबाईल असा दोन लाख साठ हजार रुपये चा मुद्देमाल लुटल्याची घटना मंगळवारी पहाटे केसापूरी येथे घडली. याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.आज पहाटे चालक शेख अख्तर शेख पाशा (वय 32, वर्षे ) हे माजलगाव ते परतुर या मार्गावर ट्रक (एम.एच.43 वाय 2584) घेवून जात होते. दरम्यान, केसापुरी गावाजवळ एका विना क्रमांकाच्या बाईक रस्त्यात आडवी लावून तिघांनी ट्रक थांबवली. काही कळण्याच्या आत तिघांनी रॉड, चाकू, कोयत्याचा धाक दाखवत चालक शेख अख्तर आणि त्यांच्या साथीदाराला मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यानंतर नगदी दोन लाख पन्नास हजार आणि दोन मोबाईल असा एकूण दोन  लाख साठ हजाराचा मुद्देमाल लुटून तिघांनी बाईकवरून पोबारा केला.जखमी चालक शेख अख्तर यांनी या घटनेची माहिती माजलगाव ग्रामीण पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. जखमींवर उपचार सुरू असून याप्रकरणी शेख अख्तर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात तिघांजणा विरोधात माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात दरोडयाचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक निरीक्षक विजयसिंह जोनवाल हे करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा