Subscribe Us

header ads

स्कुटीला अज्ञात वाहनाने समोरासमोर धडक दिल्याने दोन तरुणांचा मृत्यू

बीड स्पीड न्यूज 

स्कुटीला अज्ञात वाहनाने समोरासमोर धडक दिल्याने दोन तरुणांचा मृत्यू


बीड_ मित्राला परळी येथे रेल्वे स्टेशनवर सोडून स्कुटीवरुन परतताना वडवणीच्या पुढे रात्री १२ च्या दरम्यान दुचाकीला अज्ञात वाहनाने समोरासमोर जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन तरुण गंभीर जखमी झाले होते. दोघांनाही अत्यवस्थ अवस्थेत बीड जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. येथे डॉक्टरांनी तपासणी करून मृत्यू झाल्याचे घोषित केले. अपघात इतका भीषण होता की, स्कुटीचा चुराडा झाला असून घटनास्थळी रक्तच रक्त होते.हाफेज मारुफ फारोखी (वय-२३ रा. बशीर गंज बीड), शाहेद बागवान (वय २१ रा. बीड) असे मयत मित्रांची नावं आहेत. हे दोघेही हैद्राबादला जाणाऱ्या मित्राला परळी येथे रेल्वे स्टेशनवर सोडण्यासाठी गेले होते. मित्राला सोडून स्कुटी क्रमांक एम. एच. २३ बी डी. २५०० वरुन बीडकडे येत होते. यावेळी वडवणी-घाटसावळी दरम्यान रात्री १२ च्या सुमारास समोरुन येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने घडलेल्या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले होते. अत्यवस्थ अवस्थेत दोघांनाही उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात येताच डॉक्टरांनी तपासणी करून मृत्यू झाल्याचे घोषित केले. अपघात इतका भीषण होता. की, स्कुटीचा पुर्णपणे चुराडा झाला घटनास्थळी रक्त सांडले असल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होता. या घटनेने कुटुंबावर दुःखाचं डोंगर कोसळले असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा