Subscribe Us

header ads

माजलगावच्या मुख्याधिकाऱ्यांविरुद्ध उच्च न्यायालयाचे पकड वॉरंट

बीड स्पीड न्यूज 

माजलगावच्या मुख्याधिकाऱ्यांविरुद्ध उच्च न्यायालयाचे पकड वॉरंट 

माजलगाव प्रतिनिधी : मनोहर कांबळे यांनी दाखल केलेल्या रीत याचिकेच्या संदर्भाने माजलगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या विरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने पकड वॉरंट काढले आहे. विशाल भोसले यांना ४ एप्रिल रोजी न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.माजलगाव नगरपालिकेच्या संदर्भाने मनोहर कांबळे यांनी दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात न्या. रवींद्र घुगे आणि न्या. एस जी मेहरे यांच्या पिठासमोर सुरु आहे. या प्रकरणात माजलगावचे मुख्याधिकारी विशाल भोसले हे गैरहजर राहिल्याने उच्च न्यालयाने अखेर त्यांच्या विरोधात पकड वॉरंट काढले आहे. सदर वॉरंट हे जामीनपात्र असून पोलिसांनी त्यांना पकडून २५ हजाराच्या जामिनावर सोडावे आणि ४ एप्रिल रोजी न्यायालयासमोर हजर करावे असे वॉरंट काढण्यात आले आहे. यामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा