Subscribe Us

header ads

तिसऱ्या मजल्यावरुन फेकून विवाहितेचा खून, शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल!


बीड स्पीड न्यूज 

तिसऱ्या मजल्यावरुन फेकून विवाहितेचा खून, शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल!


बीड-: सहा महिन्यापूर्वी लग्न झालेल्या एका 20 वर्षीय विवाहितेला तिसऱ्या मजल्यावरून फेकून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना बीड शहरातील शाहूनगर भागात गुरुवारी सकाळी सात वाजता घडली. या प्रकरणी आरोपी पती, दीर व जाऊविरुद्ध शिवाजीनगर पोलिस  ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.यासमीन शकूर शेख (वय 20 वर्षे, रा. शाहूनगर, बीड) असे मयत विवाहितेचे नाव आहे. तिचे वडील रहीम शरिफोद्दिन शेख रा. इस्लामपुरा, बीड यांच्या तक्रारीनुसार, 26 ऑक्टोबर 2021 रोजी तिचा विवाह शकूर बशीर शेख (29) याच्याशी झाला होता. शकूर हा मिस्त्रीकाम करतो. लग्न होऊन एक महिना उलटल्यानंतर यासमीनचा छड होण्यास सुरुवात झाली. गुरुवार दि. 24 रोजी सकाळी सात  वाजता ती घराच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली फेकून दिले सुरूवातीचा एक महिना सासरच्या लोकांनी यास्मीन हिस चांगल्या प्रकारे सांभाळ केला मात्र त्यानंतर सासरकडील सर्वच लोकांनी तिला शारिरीक व मानसिक त्रास देण्यास सुरूवात केली. वेळोवेळी याची माहिती यास्मीन हिने तिच्या आई-वडिलांना दिली.  मात्र आज सकाळी शाहूनगर भागातील राहत्या घरी यास्मीन हिस सासरच्या लोकांनी मिळुन तिसऱ्या मजल्यावरून खाली फेकुन दिले.यास्मीन हिचा जागीच मृत्यु झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असुन घटनास्थळी बीडचे पोलिस उपाधीक्षक संतोष वाळके, शिवाजीनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक केतन राठोड, तपास  उपनिरीक्षक बाळराजे दराडे, यांच्यासह कर्मचाऱ्यांनी सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा केला असुन जिल्हा रूग्णालयात यास्मीन हिला दाखल केला असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणी फिर्यादी शेख रईस शरिफोद्दीन यांच्या तक्रारीवरून शिवाजी नगर पोलीस ठाण्यात आरोपी नवरा शेख शकुर बशिर, शेख नसीर बशिर, सोफीया नसीर बसीर यांच्या विरोधात कलम ३०२,३४ भांदवी नुसार खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास पीएसआय शेजुळ हे करत आहेत.या घटनेची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरताच नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालय, पोलीस ठाण्यासह घरी गर्दी केली होती.या प्रकरणी पती शेख शकूर यास ताब्यात घेतले आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा