Subscribe Us

header ads

वंचित बहुजन आघाडी च्या महिला बीड जिल्हा कार्यकारणी इच्छुकांच्या मुलाखती संपन्न

बीड स्पीड न्यूज 


वंचित बहुजन आघाडी च्या महिला बीड जिल्हा कार्यकारणी इच्छुकांच्या मुलाखती संपन्न

बीड (प्रतिनिधी) दि. 24 वंचित बहुजन आघाडी बीड च्या निरीक्षक ॲड लता बामणे व मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये शासकीय विश्रामगृह बीड येथे महत्वपूर्ण बैठक आयोजित केली होती व त्यानंतर बीड जिल्हा महिला कार्यकारणी इच्छुक महिलांच्या मुलाखती घेण्यात आल्या तत्पूर्वी बीडच्या निरीक्षक ॲड लता बामणे यांचा जिल्हा पदाधिकारी व तालुका पदाधिकारी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करण्यात आला यावेळी मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील जिल्हा उपाध्यक्ष संतोष जोगदंड बबन वडमारे,सहसचिव पुरुषोत्तम वीर बालाजी जगतकर नेत्या पुष्पाताई तुरुकमाने, छायाताई गडगे ज्ञानेश्वर कवठेकर,डॉ गणेश खेमाडे किरण आदी प्रमुख उपस्थित होते जिल्हा महिला कार्यकारणी निवडीच्या च्या मुलाखती 

आज घेण्यात आल्या यामुळे बीड तालुक्यातील बीड शहरातील महिलांनी असंख्य महिलांनी मुलाखती दिल्या या कार्यक्रमाला बीड शहरातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यामध्ये लखन काका जोगदंड गणेश वीर संदीप जाधव राजू कांबळे गणेश शिंदे ऍड अनिता चक्रे राजेश्वरी लांडगे  जिजाई साळवे सुरेखा जाधव, सारिका गायकवाड, स्वाती खुळे भंडारे दिपाली तांगडे भाग्यश्री डोंगरे कल्पना गोरे आदी महिलांनी जिल्हा कार्यकर्ते जिल्हा व तालुका पदाधिकारी कार्यकारणी साठी  मुलाखती दिल्या आहेत या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुरुषोत्तम वीर यांनी केले तर आभार प्रदर्शन बालाजी जगत कर यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा