Subscribe Us

header ads

पालकमंत्री धनंजय मुंडे यांची आणखी एक शब्दपूर्ती; सिरसाळा येथे शादीखाना बांधकामासाठी 1 कोटी रुपये निधी मंजूर

बीड स्पीड न्यूज 

पालकमंत्री धनंजय मुंडे यांची आणखी एक शब्दपूर्ती; सिरसाळा येथे शादीखाना बांधकामासाठी 1 कोटी रुपये निधी मंजूर

अल्पसंख्याक विभागाकडून बीड जिल्ह्यातील विविध कामांसाठी 4 कोटी 95 लाख निधी मंजूर

मुंबई (दि. 01) ---- : परळी तालुक्यातील शिरसाळा येथील ग्रामस्थांना विधानसभा निवडणुकीत दिलेला शब्द पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी पूर्ण केला असून शिरसाळा येथील अल्पसंख्याक बहुल भागात शादीखाना बांधकाम करण्यासाठी अल्पसंख्याक विकास विभागाकडून एक कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. यासह बीड जिल्ह्यातील अल्पसंख्याक बहुल ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या विविध कामांना एकूण चार कोटी 95 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.परळी तालुक्यातील सिरसाळा येथील शादीखाना यासह धर्मापुरी येथील कब्रस्तान संरक्षक भिंत उभारणीसाठी 25 लाख, त्याचबरोबर बीड तालुक्यातील लिंबारुई - कब्रस्तान संरक्षक भिंत 10 लाख, पाली - मस्जिद कडे जाणारा सिमेंट रस्ता 10 लाख, शिरापूर गात - कब्रस्तान संरक्षक भिंत 5 लाख, शिरापूर धुमाळ - कब्रस्तान संरक्षक भिंत 5 लाख, नांदूर हवेली - कब्रस्तान संरक्षक भिंत 5 लाख, हिंगणी हवेली - ईदगाह मैदान संरक्षक भिंत 5 लाख, माळापुरी - कब्रस्तान संरक्षक भिंत 5 लाख, वडवणी तालुक्यातील कवडगाव बु. - संरक्षक भिंत 10 लाख, उपळी - कब्रस्तान कडे जाणारा रस्ता व पूल बांधकाम 25 लाख, माजलगाव तालुक्यातील गंगा मसला - कब्रस्तान कडे जाणारा रस्ता - 25 लाख, कल्याण नगर - कब्रस्तान संरक्षक भिंत 10 लाख, राजेवाडी - संरक्षक भिंत 10 लाख, लुखेगाव - कब्रस्तान संरक्षक भिंत 20 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.त्याचबरोबर आष्टी तालुक्यातील कडा ईदगाह मैदान संरक्षक भिंत - 15 लाख, धानोरा - ईदगाह मैदान संरक्षक भिंत 15 लाख, धामणगाव - शादीखाना 10 लाख, भाळवणी - शादीखाना 10 लाख, कारेगाव - शादीखाना 10 लाख, पुंडी येथे सिमवन्त रस्ते व नाली 20 लाख, पाटोदा तालुक्यातील दासखेड येथे एलईडी लाईट बसवणे 4 लाख, धारूर तालुक्यातील कासारी येथे सिमेंट रस्ता 6 लाख, मोरफळी येथे कब्रस्तान संरक्षक भिंत 20 लाख, बीड तालुक्यातील कुक्कडगाव येथे पेव्हर ब्लॉक बसवणे 10 लाख व एलईडी लाईट साठी 5लाख , ताडसोना येथे पेव्हर ब्लॉक बसवणे 10 लाख, चौसाळा शादीखाना 20 लाख, नेकनूर येथे कब्रस्तान संरक्षक भिंत 10 लाख, शिरूर का. तालुक्यातील राक्षसभुवन येथे कब्रस्तान संरक्षक भिंत 10 लाख, वारणी येथे शादीखाना 10 लाख, ब्राम्हनाथ येलंब येथे कब्रस्तान संरक्षक भिंत 10 लाख, जाट नांदूर कब्रस्तान संरक्षक भिंत 10 लाख आणि इस्लामपूर बावी येथील कब्रस्तान संरक्षक भिंत उभारणीसाठी 10 लाख असे एकूण 4 कोटी 95 लाख रुपयांच्या कामास मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. बीड जिल्ह्यातील अल्पसंख्याक बहुल ग्रामीण भागातील विविध लोकप्रतिनिधीनी सुचवलेल्या कामांना मान्यता देऊन निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल धनंजय मुंडे यांनी अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्यासह महाविकास आघाडी सरकारचे आभार मानले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा