Subscribe Us

header ads

7 मे रोजी बीड जिल्ह्यात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

बीड स्पीड न्यूज 

7 मे रोजी बीड जिल्ह्यात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

बीड, दि. 22-: जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीडचे श्री एच एस महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्ह्यात 7 मे 2022 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. बीड जिल्हा न्यायालय व सर्व तालुका न्यायालय मध्ये या राष्ट्रीय लोक अदालतीचे नियोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त पक्षकारांनी या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये आपली प्रकरणे समाविष्ट करून आपले तंटे तडजोडीने आनंदाने मिटून घ्यावे असे आवाहन प्रभारी जिल्हा न्यायाधीश श्री डोके व दिवाणी न्यायाधीश तथा सदस्य सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीडचे श्री गोडबोले यांनी केले.बीड येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या दालनामध्ये प्रभारी जिल्हा न्यायाधीश व अध्यक्ष विधी सेवा प्राधिकरणचे न्यायमूर्ती श्री डोके व दिवाणी न्यायाधीश तथा सदस्य सचिव विधी सेवा प्राधिकरणाचे श्री गोडबोले यांनी  राष्ट्रीय लोक अदालत संदर्भात माहिती दिली. ते म्हणाले, या राष्ट्रीय लोकन्यायालयाची सर्वसामान्य जनतेला माहिती व्हावी यासाठी शहरात आणि ग्रामीण भागांमध्ये लोक न्यायालयची माहिती ऑडिओ क्लिप द्वारे दिली जात आहे. तसेच आपली प्रकरणे ज्या न्यायालयांमध्ये प्रलंबित आहेत त्या न्यायालयामध्ये 7 मे रोजी उपस्थित राहून आपली प्रकरणे आपसात तडजोडीने निकाली काढण्याचे आवाहन देखील अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड यांनी केले आहे. 7 मे रोजी बीड जिल्ह्यातील दिवाणी प्रकरणे,तडजोडजन्य फौजदारी प्रकरणे, मोटार अपघाताची प्रकरणे, भूसंपादनाची प्रकरणे, 138 एन आय सी प्रकरणे, वसुलीची प्रकरणे, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग तसेच बँका ,पतसंस्था, बीएसएनएल, एम एस ई बी ,नगर परिषद, ग्रामपंचायत यांची घरपट्टी,नळपट्टी वसुलीची दाखल पूर्व प्रकरणे या लोक न्यायालयमध्ये ठेवण्यात येणार आहेत. सदर लोक न्यायालयमध्ये पक्षकार यांनी आपली प्रकरणे आपसामध्ये तडजोडीने मिटवून घ्यावी व आपला वेळ, श्रम व पैसा वाचावा. यापूर्वी बीड जिल्ह्यात 12 मार्च 2022 रोजी लोक न्यायालय संपन्न झाले. या लोक न्यायालयांमध्ये जवळपास 1604 प्रलंबित प्रकरणात पैकी 4736 दाखल पूर्व प्रकरणे तडजोडीने निकाली निघाले असून प्रलंबित प्रकरणांमध्ये रक्कम रुपये 13 कोटी 60 लाख 12 हजार 291 रुपये व दाखल पूर्व प्रकरणात सुमारे 30 कोटी 39 लाख 37 हजार सहा एवढ्या रकमेची वसुली झाली आहे. 7 मे रोजीच्या लोकन्यायालय मध्ये 20 एप्रिल पर्यंत बीड जिल्ह्यामध्ये जवळपास 18 हजार प्रलंबित प्रकरणे तडजोडीने ठेवण्यात आली असून आणखी पुढील दहा ते पंधरा दिवसांमध्ये जवळपास तीस हजारापर्यंत प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात येतील. सामाजिक सलोखा जोपासणारे लोकन्यायालय ठरत असल्याने या न्यायालयातील न्यायनिवाडा दोघांसाठी देखील आनंद देणारा ठरतो, असा विश्‍वास पत्रकार परिषदेत प्रभारी जिल्हा न्यायाधीश व अध्यक्ष विधी सेवा प्राधिकरण न्यायमूर्ती श्री डोके  आणि दिवानी न्यायाधीश व विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव श्री गोडबोले  यांनी व्यक्त केला.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा