Subscribe Us

header ads

बाभळगाव येथे जयभिम महोत्सव उत्साहात; रक्तदान शिबीर, भीम गीतांसह अभिवादन सभा पडली पार

बीड स्पीड न्यूज 


बाभळगाव येथे जयभिम महोत्सव उत्साहात
 रक्तदान शिबीर, भीमगीतांसह अभिवादन सभा पडली पार  


बीड / प्रतिनिधी-: माजलगाव तालुक्यातील बाभळगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये  रक्तदान शिबीर, भीमगीत रजनी, अभिवादन सभा आणि मिरवणूक आदी कार्यक्रम मोठ्या हर्ष उल्हासाने पार पडले. शनिवार (ता. १६) रोजी रक्तदान शिबिरामध्ये ३५ रक्तदात्यांची रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी जोपासली. या महोत्सवात सोमवार (ता.१८) रोजी कुणाल प्रभाकर वराळे यांचा युगपुरुष हा बुद्ध आणि भीम  गीतांचा प्रबोधनात्मक परिवर्तनवादी कार्यक्रम पार पडला. तसेच बुधवार (ता.२०) रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले सार्वजनिक जयंती अभिवादन सभा मोठ्या संख्येनं पार पडली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक प्रभा पुंडगे, उद्घाटक म्हणून स्वारीपचे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष विजय साळवे, प्रमुख उपस्थिती म्हणून वंचितचे माजी जिल्हाध्यक्ष अनिल डोंगरे, वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन उजगरे, दैनिक पुण्यभूमीचे कार्यकारी  संपादक सुनिल डोंगरे, गावचे प्रथम नागरिक दत्तात्रय 

लाटे, बसपाचे जिल्हाध्यक्ष ॲड. अमोल डोंगरे, रिपब्लिकन सेनेचे अजय गोऱ्हे, पंचायत समिती पाणी पुरवठा विभागाचे अधिकरी तायडे, अविनाश गवळी, भीम आर्मीचे सिद्धार्थ मायंदळे आदींची, शेख अहेमद यांची उपस्थिती होती. या अभिवादन सभेच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयभीम महोत्सवाचे मार्गदर्शक तथा मुख्यध्यापक विकास निकाळजे यांनी केले तर सूत्रसंचालन सूरज निकाळजे यांनी केले. आभार ॲड. अच्युत निकाळजे यांनी मानले. सायंकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची अतिशय शिस्तबद्ध मिरवणूक पार पडली. या मिरवणुकीत बाहेरवाचे लैझीम आणि डान्स पथकही सहभागी झाले होते. हा जयभिम महोत्सव उत्साहात पार पाडण्यासाठी जयंती उत्सव समितीचे उत्तमराव निकाळजे , मधुकर सोनवणे,अशोक निकाळजे, अंबादास सोनवणे, विलास सोनवणे,अर्जुन सोनवणे,पराजी मस्के,छत्रभुज पोळ, दिनकर निकाळजे, दामोदर निकाळजे, अशोक शेषराव निकाळजे यांच्यासह भीमगड युवामंच आणि आंबेडकरी युवकांनी मोठे परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा