Subscribe Us

header ads

भरधाव ट्रॅक्टरने ५ वर्षीय बालकास चिरडले

बीड स्पीड न्यूज 

भरधाव ट्रॅक्टरने ५ वर्षीय बालकास चिरडले


धारूर प्रतिनिधी-: केजकडून माजलगावकडे जाणाऱ्या ट्रॅक्टर टायरखाली येऊन शिवराज लक्ष्मण सुरवसे या पाच वर्षीय बालकाचा चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना धारूर बस डेपोच्या समोर शुक्रवारी (दि. २२) सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. सदर घटना केवळ अरुंद रस्त्यामुळे झाली आहे. मागील चार वर्षात खामगाव पंढरपूर या महामार्गाच्या धारूर घाटातील अरुंद रस्त्यामुळे कित्येकांना जीव गमवावा लागला आहे. तरी अद्यापही रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झालेला नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.येथील बस डेपोच्या समोरासमोर केजकडून माजलगावकडे जाणाऱ्या दोन ट्रॉली जोडलेल्या ट्रॅक्टरखाली (एम एच ४४ डी १९०८) शिवराज सुरवसे हा पाच वर्षीय बालक आल्याने ही दुर्घटना घडली. सदरील घटना घडल्यानंतर पाच वर्षीय बालक ट्रॅक्टरच्या मोठ्या टायरखाली अडकून पडल्याने जेसीबीच्या साह्याने ट्रॅक्टर उचलून मृत बालकाला बाहेर काढण्यात आले. घटनास्थळी धाव घेत पोलिसांनी पुढील कारवाई केली. ट्रॅक्टरखाली चिरडून मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.अपघातानंतर ट्रक्टरचा चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा