Subscribe Us

header ads

बीड शहराच्या कार्यकारीणीसाठी वंचितच्या मुलाखती; धम्मानंद साळवे, किरण वाघमारे यांचे उपस्थित राहण्याचे आवाहन

बीड स्पीड न्यूज 


बीड शहराच्या कार्यकारीणीसाठी वंचितच्या मुलाखती

धम्मानंद साळवे, किरण वाघमारे यांचे उपस्थित राहण्याचे आवाहन


बीड / प्रतिनिधी-: वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अड. प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशावरून व प्रदेश अध्यक्षा रेखाताई ठाकूर यांच्या सूचनेनुसार बीड शहराची कार्यकारीणी मुलाखती घेऊन निवडली जाणार आहे. त्यामुळे या मुलाखतीला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन, या मुलाखतीचे निरीक्षक तथा वंचितचे संघटक धम्मानंद साळवे, बीड तालुकाध्यक्ष किरण वाघमारे यांनी केले आहे. वंचित बहुजन आघाडीची बीड शहराची कार्यकारणी निवडण्यात येणार आहे त्याकरिता कार्यकर्ता मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. या मुलाखती बीड शहरातील शासकीय विश्रामगृह येथे रविवार दि. 24 एप्रिल रोजी सकाळी 10 ते 11 या वेळेत होणार आहेत. तरी या मुलाखतीला बीड शहरातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन या मुलाखतीचे निरीक्षक तथा वंचितचे संघटक धम्मानंद साळवे, बीड तालुकाध्यक्ष किरण वाघमारे यांनी केले आहे. दरम्यान वंचितचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष अशोक हिंगे व पश्चिम जिल्हाध्यक्ष उद्धव  खाडे यांच्या मार्गदशनाखाली मुलाखती पार पडणार आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा