Subscribe Us

header ads

नेतेमंडळींनी धार्मिक मुद्यांऐवजी विकासात्मक मुद्द्यांवर भर द्यावा :डॉ. नंदकुमार उघाडे

बीड स्पीड न्यूज 

नेतेमंडळींनी धार्मिक मुद्यांऐवजी विकासात्मक
 मुद्द्यांवर भर द्यावा  :डॉ. नंदकुमार उघाडे


बीड / प्रतिनिधी-:आपला शेजारी श्रीलंकेत राजकीय अराजकता माजल्यामुळे जनतेचे काय हाल होत आहेत , हे आपण प्रसारमाध्यमांवर पाहत आहोत . महागाईने उच्चांक गाठल्यामुळे श्रीलंकेची वाटचाल दिवाळखोरीकडे झुकली आहे . भारतामध्येही महागाईने उच्चांक गाठला आहे . जीडीपी दर घसरत चालला आहे. पेट्रोल , डिझेल ,  गॅससह अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडत आहेत . या मुद्द्यांवर चर्चा करून जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी सरकारला निर्णय घेण्यास भाग पाडण्याऐवजी विरोधक धार्मिक मुद्दे उचलून सामाजिक विषमता निर्माण करत आहेत.  ही घटना देशाला प्रगतीऐवजी अधोगतीकडे घेऊन जाणारी आहे . असे विविध विषयांवर पुस्तके लिहिणारे लेखक व राज्यघटनेचे अभ्यासक डॉ. नंदकुमार उघाडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे .हिंदू , मुस्लिम , शीख , बौद्ध ,जैन , ख्रिश्चन  या सर्वच धर्मातील बहुतेक जणांना इतर धर्मातील एक तरी मित्र आहे. असे नमूद करून डॉ. उघाडे यांनी पुढे म्हटले आहे की ,राज्यघटनेच्या सरनाम्यात स्पष्ट उल्लेख केलेला आहे की , सार्वभौम , समाजवादी ,  धर्मनिरपेक्ष , लोकशाही , गणराज्य . सरनाम्यातील धर्मनिरपेक्ष शब्दाप्रमाणे सर्व जण इतर धर्माचा आदर करून गुण्यागोविंदाने राहत आहेत . सर्व धर्मीयांचे एकमेकांशी सर्व व्यवहार बंधूभाव प्रमाणे पार पडतात. मात्र घरी येऊन न्यूज चॅनेल सुरू करताच धार्मिकतेची आणि जातीयतेची जाणीव होते. असे एकही न्यूज चॅनल नाही की, जे सतत जनतेची व देशाची प्रगती साधण्यासाठी विकासात्मक मुद्द्यांवर चर्चा घडवून आणते. बहुतांश न्यूज चॅनल धार्मिक मुद्द्यावरच चर्चा घडवून आणतात. विविध राजकीय पक्षाचे व धर्माचे काही लोक तिथे बसून धार्मिकतेच्या नावाने आग ओकून सामाजिक विषमता वाढत आहेत. विधायक कामासाठी सत्तेचा वापर कसा करायचा हे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना दाखवून द्यायचे असते. जनहिताचा नसलेला एखादा निर्णय ब्रिटिशांनी घेतल्यास डॉ. आंबेडकर किंवा महात्मा गांधी यांनी विरोध केल्यास ब्रिटिश सत्ताधारी घाबरत असत आणि तो निर्णय मागे घेत असत. राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वांपासून सत्ताधारी थोडेही ढळणार नाहीत याची दक्षता विरोधकांनी घ्यायची असते आणि जनहिताचे निर्णय घेण्यास सत्ताधाऱ्यांना भाग पाडायचे असते.अनावश्यक मुद्द्यांवर सामाजिक वातावरण गढूळ करण्याऐवजी सत्तेत नसलेल्या नेत्यांनी सत्ताधाऱ्यांना विकासात्मक मुद्दे अंमलात आणण्यास भाग पडावे. असेही डॉ. उघाडे यांनी म्हटले आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा