Subscribe Us

header ads

‘सकाळ’चे दत्ता देशमुख आदर्श पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित

बीड स्पीड न्यूज 

ओळी : केज : केज तालुका आदर्श पत्रकार समितीच्या वतीने जेष्ठ नेते राजेसाहेब देशमुख यांच्या हस्ते दत्ता देशमुख यांचा रविवारी आदर्श पत्रकारिता पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळी पत्रकार संघाचे पदाधिकारी.
---
‘सकाळ’चे दत्ता देशमुख आदर्श पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित
-----

केज, दि. ३ (प्रतिनिधी) : येथील तालुका आदर्श पत्रकार समितीच्या वतीने दर्पण दिन व मुकनायक दिना निमित्त देण्यात येणाऱ्या आदर्श पत्रकारिता पुरस्काराने ‘सकाळ’चे जिल्हा बातमीदार दत्ता देशमुख यांचा सन्मान करण्यात आला.माजी सभापती तथा अंबा कारखान्याचे माजी अध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन श्री. देशमुख यांचा रविवारी (दि. तीन) सन्मान करण्यात आला. राजेसाहेब देशमुख म्हणाले, कृषी, शिक्षण, सहकार, राजकारण अशा विविध क्षेत्रातील दत्ता देशमुख यांचे अभ्यासपूर्ण लिखान असते. विडा (ता. केज) ते बीडपर्यंत त्यांनी पत्रकारितेचा प्रवास मोठ्या सचोटीने केला. श्री. देशमुख यांच्या निर्भीड व निष्पक्ष पत्रकारितेची दखल घेत त्यांचा सन्मान केल्याचे समिती अध्यक्ष अशोक सोनवणे यांनी सांगीतले. यावेळी समितीचे मागदर्शक धनंजय देशमुख, जेष्ठ पत्रकार अभय कुलकर्णी, धनंजय कुलकर्णी, माजी अध्यक्ष विजय अरकडे, गौतम बचुटे उपस्थित होते. दरम्यान, यापूर्वीही ११ वर्षांपूर्वी विडा येथे बातमीदारी करत असताना त्यांना याच पुरस्काराने गौरविण्यात आले होते. दत्ता देशमुख यांचा यापूर्वी ‘सकाळ’चे संस्थापक डॉ. ना. भी. परुळेकर यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पुरस्काराने सन्मान झाला आहे. तसेच, पत्रमहर्षी स्व. मोहनलालजी बियाणी राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार, जिल्हा रत्न पुरस्कार, जिजाऊ रत्न पुरस्कार, कै. त्र्यंबक आसरडोहकर पत्रकारिता पुरस्कार, मौलाना अबुल कलाम पत्रकारिता पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा