Subscribe Us

header ads

संस्कार भारतीच्या कनकालेश्वर महोत्सवामुळे बीडच्या सांस्कृतीक वैभवात भर पडली: डॉ.भारतभुषण क्षीरसागर

बीड स्पीड न्यूज 


संस्कार भारतीच्या कनकालेश्वर महोत्सवामुळे बीडच्या
सांस्कृतीक वैभवात भर पडली: डॉ.भारतभुषण क्षीरसागर
------------------------------------------------
रतरंगत्या रंगमंचावरील नृत्याविष्कारासह कवीसंमेलनाने आणली रंगत
बीडमध्ये २६ व्या कनकालेश्वर महोत्सवाचे शानदार उद्घाटन

प्रतिनिधी । बीड-:संस्कार भारतीच्या  कनकालेश्वर महोत्सवामुळे बीड शहराच्या सांस्कृतीक   वैभवात भर पडत असुन  कनकालेश्वरच्या आशीर्वादानेच मी ३५ वर्ष बीड नगर पालिकेचा नगराध्यक्ष राहु शकलो. कनकालेश्वर मंदिराच्या  विकासासाठी आम्ही नेहमीच कटीब्ध्द असल्याचे प्रतिपादन बीडचे नगराध्यक्ष डॉ.भारतभुषण क्षीरसागर यांनी केले.बीड शहरातील कनकालेश्वर शिवमंदिरात शनिवार २ एप्रील २०२२ रोजी  संध्याकाळी साडेसात वाजता गुढीपाडवा व नववर्षाच्या निमित्ताने  २६ व्या कनकालेश्वर महोत्सवाच्या उदघाटनाप्रसंगी डॉ. 
भारतभुषण क्षीरसागर बोलत होते. यावेळी   व्यासपीठावर संस्कार भारती देवगिरी प्रांतचे अध्यक्ष भरत लोळगे, संस्कार भारती देवगिरी प्रांतचे कार्याध्यक्ष भगवान देशमुख यांच्यासह कवी प्रभाकर साळेगावकर, श्रावण गिरी, डॉ.मुकूंद राजपंखे, राजेसाहेब कदम , नगरसेवक विलास विधाते आदी उपस्थीत होते. पुढे नगराध्यक्ष क्षीरसागर  म्हणाले की, मागील २५ वर्षांपासून मी या महोत्सवास  उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेत  आहे. कनकालेश्वर महोत्सवाचे  यंदाचे २६  वे वर्ष  आहे. कोरोनाच्या संकटामुळे मागील दोन वर्षाच्या काळात हा महोत्सव  होऊ शकला नाही. परंतु आता शासनाने कोरोनाचे  सर्व निर्बंध  उठवल्यामुळे बीडकरांना या महोत्सवाचा आनंद घेता येत आहे. महाराष्ट्रात कुठेही नाही असे अध्यात्मिक, ऐतिहासिक, कलात्मक कनकालेश्वर मंदिर बीड शहरात  असुन आमच्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. आम्ही पक्ष, गट-तट न बघता चांगले कार्यक्रम  कोणी घेत असेल तर त्यांना कायम 

मदतच करत आलो आहोत.अाणि आम्ही हे आमच कर्तव्य समजतो.  स्व.काकूंच्या काळापासून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे काम करत आहोत. संस्कार भारतीने कनकालेश्वर महोत्सवाच्या माध्यमातुन सांस्कृतीक चळवळ जपली आहे. असेही त्यांनी सांगीतले. यावेळी उपस्थीत मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून कनकालेश्वर महोत्सवाचे शानदार उद्घाटन करण्यात आले. संस्कार भारतीच्या वतीने सर्व उपस्थीत मान्यवरांचा  शाल , पुष्पहार, स्मृतिचिन्ह देवुन सत्कार करण्यात आला. प्रास्तविक संस्कार भारतीचे जिल्हाध्यक्ष  प्रमोद वझे तर सुत्रसंचलन सुरेश साळुंके, आभार लक्ष्मीकांत सौंदत्तीकर यांनी मानले. या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी संस्कार भारती बीडचे जिल्हाध्यक्ष प्रमोद वझे, कुलदिपजी धुमाळे,वासुदेव निलंगेकर,लक्ष्मीकांत सौंदत्तीकर, गणेश तालखेडकर, जगदीश पिंगळे, संतोष पारगावकर  लक्ष्मीकांत रुईकर, प्रकाश मानुरकर, अनिल कुलकर्णी गणेश स्वामी, केदारनाथ बहिरमल, सुजित देशमुख,अशोका कुलकर्णी अनुराधा चिंचोलकर, सोनल पाटील,महेश देशमुख, अशोक देवा कुलकर्णी, राहुल पांडव, डॉ रवि शिवणीकर यांनी परिश्रम घेतले
-----------------
नृत्याविष्काराने बीडकर मंत्रमुग्ध

कनकालेश्वर मंदिराच्या पाण्यात खास तरंगते रंगमंच तयार करण्यात आले होते. या तरंगत्या रंगमंचावर औरंगाबाद येथील नृत्यसुधा डान्स अॅकॅडमीच्या  प्राजक्ता आपोनारायण व यांच्या टीम मधील कलाकारांनी  नृत्याविष्कार सादर करत बीडकरांना मंत्रमुग्ध केले. त्यांनतर स्वातंत्र्याच्या  अमृत महोत्सवा निमित्त “जय हो” हा स्वातंत्र्य विरांच्या स्मरणार्थ संस्कार भारतीच्या वतीने  देशभक्तीपर कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमात संस्कार भारतीच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रपुरूषांच्या वेशभुषा साकारात स्वातंत्र्य लढाच डोळ्यासमोर ठेवत क्रांतीकारकांना मानाच मुजरा केला.
----------

कवीसंमेलनाला रसीकांची दाद

कनकालेश्वर महोत्सवात तरंगत्या रंगमंचावर जिल्ह्यातील सुप्रसिध्द कवी प्रभाकर साळेगावकर, श्रावण गिरी, डॉ.मुकूंद राजपंखे, राजेसाहेब कदम यांनी विविध प्रकारच्या कवीता सादर करत रसकांच्या टाळ्या मिळवल्या. देशभक्ती, सामाजीक प्रबोधनात्मक कवितांनी या संमेलनात रंग भरला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा