Subscribe Us

header ads

लिंबागणेश येथील शेतक-याची आंब्याची बाग शाॅर्टसर्कीटमुळे आगीत भस्मसात, तलाठी, मंडळ आधिका-यांनी केला स्थळपंचनामा

बीड स्पीड न्यूज 


लिंबागणेश येथील शेतक-याची आंब्याची बाग शाॅर्टसर्कीटमुळे आगीत भस्मसात, तलाठी, मंडळ आधिका-यांनी केला  स्थळपंचनामा 
_____
बीड प्रतिनिधी-:बीड तालुक्यातील मौजे लिंबागणेश येथिल रहिवाशी सुशीलकुमार सारंगधर गिरे, सुरेखा सारंगधर गिरे, सार्थक सुशील गिरे, भुषण सुशीलकुमार गिरे यांच्या गट नंबर ३७२ मधिल प्रत्येकी ४० आर क्षेत्रातील केशर, हापूस आंब्याच्या जातीची १२ वर्षे वयाची फळ धारणा केलेली एकुण १०५ झाडे  विद्युत घर्षणामुळे दिनांक २ एप्रिल २०२२ वार शनिवार रोजी दुपारी २ च्या सुमारास आगीत भस्मसात झाली. 

तलाठी पोतदार, मंडळ आधिकारी वंजारे यांनी स्थळपंचनामा करून अहवाल सादर 
_____
आज दि. ३ एप्रिल रविवार रोजी दुपारी २ वाजता तलाठी गणपत पोतदार, लिंबागणेश सज्जा आणि मंडळ आधिकारी आण्णासाहेब वंजारे विभाग लिंबागणेश व सज्जा लिंबागणेश यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून अहवाल तहसिलदार यांना पाठवला ,पंचनाम्यावर डाॅ.गणेश श्रीधर ढवळे,  राजाभाऊ श्रीधर गिरे, बाळकृष्ण तुकाराम थोरात, सचिन सारंगधर गिरे, अशोक राजाभाऊ गिरे यांच्या स्वाक्ष-या आहेत. 

डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर 
मो. नं.८१८०९२७५७२

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा