Subscribe Us

header ads

शांतीवनातील डोंगराला लागलेल्या आगीत केशर आंब्यासह २०० झाडे आगीत भस्मसात; समाजकंटकाविरोधात रोष तर वनविभागातील आधिका-यांचा हलगर्जीपणा

बीड स्पीड न्यूज 

शांतीवनातील डोंगराला लागलेल्या आगीत केशर आंब्यासह २०० झाडे आगीत भस्मसात; समाजकंटकाविरोधात रोष तर वनविभागातील आधिका-यांचा हलगर्जीपणा 
____
बीड प्रतिनिधी-:शिरूर कासार तालुक्यातील आर्वी येथील ऊसतोड मजुरांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्प म्हणून प्रकल्प संचालक दिपक नागरगोजे यांच्या मार्गदर्शनात २२ वर्षापासून कार्यरत असून शांतीवन परीसरातील डोंगरावर विविध फळबागा तसेच पिंपळ, वड, उंबर आदिं झाडांची लागवड करून नंदनवन केले असून दि.१ एप्रिल शुक्रवार रोजी अज्ञात समाजकंटकाने लावलेल्या आगीत ४ वर्षापासून लावलेल्या फळ धारणा केलेल्या केशर आंब्यासह पिंपळ, वड, उंबर आदि साधारणतः २०० झाडे आगीत भस्मसात झाली असून प्रकल्प संचालक दिपक नागरगोजे व स्वयंसेवकांनी झाडाच्या पाल्याने आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, जवळपास पाणी नसल्याने बहुतांश झाडांचे नुकसान झाले. 

शांतीवनातील मुलांप्रमाणेच झाडांचा सांभाळ केला, घटना अत्यंत वेदनादायी :-दिपक नागरगोजे ,प्रकल्प संचालक शांतीवन आर्वी 
_____
गेल्या ४ वर्षापासून संस्थेतील लेकरांसाठी विविध फळबागांची लागवड केली होती उन्हाळ्यात पाणी उपलब्ध नसताना ईतर ठिकाणाहुन पाणी आणून ठींबक सिंचन द्वारे झाडे जगवली, फळ धारणा केलेली पोटच्या लेकराप्रमाणे जपलेली झाडे क्षणार्धात आगीत भस्मसात झालेली घटना अत्यंत क्लेशदायक आणि तितकीच संतापजनक आहे. 

वनविभागातील आधिका-यांना गांभीर्य नाही, मुख्यमंत्री, वनमंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिका-यांना तक्रार:-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर 
____
बीड जिल्ह्य़ातील वनविभागातील आधिका-यांचा बेजबाबदारपणा वारंवार सिद्ध होत असून गेल्या महिन्यात सह्याद्री-देवराई परीसरात महिनाभरातच दोन वेळा आगीच्या घटना व वेळेवर लक्ष न देणे अशाच प्रकारचा हलगर्जिपणा शांतीवनातील डोंगराला लागलेल्या आगीत घडला असुन वनविभागातील आधिका-यांना आगीची घटना कळवुन सुद्धा वेळेवर पोहोचलेच नाहीत, संबधित घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी यासाठी जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, वनविभागीय आधिकारी बीड यांच्यामार्फत मुख्यमंत्री, वनमंत्री,सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड,विभागीय आयुक्त यांना तक्रार केली आहे.

डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर 
मो. नं. ८१८०९२७५७२
___

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा