Subscribe Us

header ads

बीडच्या जिल्हा रुग्णालयात संतापजनक प्रकार; प्रसूती वॉर्डमध्ये होम थिएटर लावून महिला कर्मचाऱ्यांचा धिंगाणा!

बीड स्पीड न्यूज 


बीडच्या जिल्हा रुग्णालयात 

संतापजनक प्रकार, प्रसूती 

वॉर्डमध्ये होम थिएटर लावून  

महिला कर्मचाऱ्यांचा 

धिंगाणा



बीड, 15 एप्रिल-:
 बीड जिल्हा रुग्णालयात प्रसूती वार्डात स्टाफ नर्स आणि मेंटर्सने होम थिएटर लावून धिंगाना घातल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्टाफ नर्सच्या या विचित्र प्रकारचा व्हिडीओ देखील आता समोर आला आहे. नवजात बालक आणि माता असलेल्या वॉर्डमध्ये कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांकडून अक्षरश: धिंगाणा घातला गेला आहे. त्यांच्या या वागणुकीमुळे गर्भवती महिला आणि नवजात बालकांना डॉक्टर आणि नर्सेसची ताटकळत वाट पाहावी लागली. या सर्व घटनेवर सर्वसामान्यांकडून संताप व्यक्त केला जातोय.संबंधित प्रकार हा बीड जिल्हा रुग्णालयात गुरुवारी (14 एप्रिल) संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडला. संबंधित प्रकार हा प्रसूती वॉर्डमध्ये घडला. या वॉर्डमध्ये नऊ ते दहा माता आणि नवजात बालकांवर उपचार सुरु होते. रुग्ण ताटकळत असताना रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून धिंगाणा सुरु होता. या धिंगाण्याचे व्हिडीओ समोर आल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या वागणुकीवर टीका होत आहे. संबंधित प्रकरणाची तक्रार जिल्हा चिकित्सकांपर्यंत पोहोचली आहे. त्यांनी या प्रकरणी चौकशी करुन योग्य कारवाई करणार असल्याचं सांगितलं आहे.जिल्हा शल्य चिकित्सक सुरेश साबळे यांनी यावेळी माहिती दिली मी आझादीचं अमृत महोत्सव असल्यामुळे काल मोतीबिंदू शिबिरचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामुळे मी तिकडे शिबिरला गेलेलो होतो. पण हा व्हिडीओ मी फेसबुकवर पाहिला. त्यानंतर आमचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक आहेत डॉ. सुखदेव राठोड यांना मी प्राथमिक चौकशी करुन अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे. याशिवाय आजही मी शिबिरात होतो. त्या व्हिडीओची सतत्यता आम्ही तपासून पाहणार आहोत. जर तसा प्रकार घडला असेलच तर संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल असं जिल्हा शल्य चिकित्सक सुरेश साबळे यांनी सांगितलं. तसेच संबंधित घटनेचं कुणीही समर्थन करणार नाही. ज्याठिकाणी संबंधित प्रकार घडला ती जागा निश्चितच त्या प्रकारासाठी योग्य नाही असंही चिकित्सक सुरेश साबळे यावेळी म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा