Subscribe Us

header ads

पुरोहित संतोष पाठक खून प्रकरण; आरोपीस तीन दिवसांची पोलीस कोठडी

बीड स्पीड न्यूज 


पुरोहित संतोष पाठक खून प्रकरण;  आरोपीस तीन दिवसांची पोलीस कोठडी

अंबाजोगाई-:अंबाजोगाई शेपवाडी येथे शनिवारी दुपारी पुरोहित संतोष दुर्गादास पाठक (वय ५२) यांच्यावर चाकूने सपासप वार करीत त्यांची निर्घृण हत्या केलेला आरोपी पांडुरंग अच्युत शेप यास रविवारी न्यायालया समोर हजर केले होते. त्या स तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.शनिवारी गुडीपाडव्याच्या दिवशी रविवारपेठ, अंबाजोगाई येथील रहिवासी असलेले पुरोहित संतोष दुर्गादास पाठक (वय-५२) हे शेपवाडी येथे पौरोहित्य करण्यासाठी गेले होते.दुपारी एक वाजता ते मारुती मंदिरात असताना आरोपी पांडुरंग अच्युत शेप (वय २७) रा.शेपवाडी याने विना कारण हातातील चाकूने पुरोहित संतोष पाठक यांच्यावर सपासप वार करत त्यांची निर्घृणपणे हत्या केली. या वेळी मंदिरात उपस्थित असणाऱ्या महिलांनी आरोपीस रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र  तो चाकूने वार करत राहिला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पाठक यांना शेपवाडी येथील ग्रामस्थांनी अंबाजोगाई च्या स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र संतोष पाठक यांचा त्यापूर्वीच मृत्यू झाला होता.या प्रकरणी महेश दुर्गादास पाठक यांच्या फिर्यादीवरून आरोपी पांडुरंग अच्युत शेप याच्या विरुद्ध कलम ३०२ भादवी नुसार गुन्हा नोंद करण्यात आला. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार करीत आहेत.

तीन दिवसांची पोलीस कोठडी

शेपवाडी खून प्रकरणातील आरोपी पांडुरंग अच्युत शेप यास रविवारी प्रथमवर्ग न्यायाधीश सी. एम. खारकर यांच्या न्यायालया समोर उभे केले असता. त्याला तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. आरोपी पांडुरंग याची प्रकृती ठीक नसल्याने त्याला उपचारासाठी दाखल करण्याचे ही न्यायालयाने सांगितले. पांडुरंग शेप यास स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता. पुढील उपचारासाठी त्यास पुणे इथे पाठविण्याचा सल्ला स्थानिक रुग्णालयाने दिला.

आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात हजर

पाठक यांची निर्दयीपणे हत्या केल्यानंतर या घटनेतील आरोपी पांडुरंग अच्युत शेप हा स्वतः पोलीस ठाण्यात शनिवारी दुपारी हजर झाला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केली.

अप्पर पोलीस अधीक्षक यांची घटनास्थळी भेट

या घडलेल्या घटनेनंतर अंबाजोगाई च्या अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. या घटनास्थळाचा पोलीस पंचनामा करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा