Subscribe Us

header ads

शासनाच्या अधिनियमानुसार जनरल स्टोअर्स लिहायचे की सामान्य दुकान!

बीड स्पीड न्यूज 


शासनाच्या अधिनियमानुसार जनरल स्टोअर्स लिहायचे की सामान्य दुकान!
                   

 डॉ. नंदकुमार उघाडे : नामफलक मराठी देवनागरी लिपित लावण्या बाबतचा अधिनियम जारी


बीड / प्रतिनिधी-:महाराष्ट्र शासनाने नुकताच दुकाने व आस्थापनांना नामफलक मराठी देवनागरी लिपित लावण्या बाबतचा अधिनियम जारी केला. या अधिनियमानुसार महाराष्ट्रातील सर्व दुकाने व आस्थापनांना मराठी भाषेतील नामफलक प्रदर्शित करणे अनिवार्य आहे . मराठी भाषेत नामफलक म्हणजे इंग्रजी शब्द मराठीत लिहायचे की त्याचे भाषांतर करून मराठी भाषेत लिहायचे? General stores हा नामफलक जनरल स्टोअर असा लिहायचा असेल तर तो इंग्रजी शब्द आहे. जनरल स्टोअर्स हा शब्द मराठीत लिहायचा असेल तर सामान्य दुकान किंवा सामान्य संग्रह असा लिहावा लागेल. असे विविध स्पर्धा परीक्षांसाठी पुस्तके लिहिणारे लेखक व ज्येष्ठ पत्रकार डॉ. नंदकुमार उघाडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे तिचा सर्वांना अभिमान आहे आणि असावा. असे नमूद करून डॉ. उघाडे यांनी पुढे म्हटले आहे की, मराठी भाषा ही सर्वात समृद्ध भाषा आहे. या भाषेत कानडी, उर्दू ,तेलगू , इंग्रजी, पारशी या भाषांमधूनही काही शब्द आलेले आहेत आणि ते मराठी भाषिकांच्या अंगवळणी पडले आहेत. समजा एखाद्या व्यक्तीने आपल्या दुकानाचा पत्ता शुद्ध मराठी भाषेत सांगितला की " चौकातील आवक-जावक समय सूचक दीपकच्या " उजव्या कोपऱ्यात माझे दुकान आहे. हे लगेच लक्षात येणार नाही पण तेच त्याने इंग्रजी शब्द वापरून " सिग्नलच्या "  बाजूला दुकान आहे असे सांगितल्यास लगेच लक्षात येईल . गाडीतून उतरल्यास वडिलांनी मुलाला फोन केला आणि म्हणाले की ,. मी लोहित पटरी धारकर स्थानकावर आलो आहे मला घ्यायला ये ! हे शब्द ऐकताच मुलगा चक्राऊन जाईल आणि आपल्या बाबांना काय झाले याचा विचार करेल. पण लोहित पटरी धारक स्थानक ऐवजी जर ' रेल्वे स्टेशन '   हा इंग्रजी शब्द वापरला तर लगेच लक्षात येते. आपण आपली गाडी घेऊन पंक्चर दुकानावर गेलो आणि त्याला म्हणालो , " माझ्या दुचक्र वाहिनीच्या अग्र चक्रातील हवेचा दाब कमी झाला आहे कृपया आपल्या हवा ठोसन यंत्राने पूर्ववत करावा. हे शब्द ऐकताच तो हवा भरणारा नक्कीच आपल्याला वेडा समजेल. लिफ्ट , मोबाईल , टेबल यांसारखे अनेक इंग्रजी शब्द आहेत जे मराठी भाषेत रूढ झाले आहेत आणि ते सर्वांनाच कळतात पण याच इंग्रजी शब्दांचे मराठी शब्द जसे लिफ्ट ऐवजी उद्वेषक मोबाईल ऐवजी भ्रमणध्वनी टेबल ऐवजी  मेज हे अशिक्षितांनाय काय  सुशिक्षितांनाही लवकर समजत नाही .मराठी माणसांची मते आपल्याला मिळावी म्हणून मराठीचा पुळका दाखवून जनतेला झुंडशाहीच्या दिशेने घेऊन जाणे कितपत योग्य आहे. दुकाने व आस्थापनांचे नामफलक बदलल्याने आणि परप्रांतीयांचा  द्वेष करून जनतेचा आणि देशाचा विकास साध्य होत नसतो. जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल यांच्या प्रमाणे विकासात्मक ठोस निर्णय घ्यावे लागतात. मराठी बद्दल तुम्हाला इतका पुळका आहे तर मराठी शाळा बंद का पडत चालल्या आहेत ? मराठी शाळांची दूर्दशा होण्यास जबाबदार कोण आहे,  राज्यकर्ते म्हणून याचा कधी विचार केलात का ?  असा सवाल डॉ. नंदकुमार उघाडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून राज्यकर्त्यांना केला आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा