Subscribe Us

header ads

बीड शहरातील पाणीप्रश्नी रिपाइं आक्रमक; पालिका राज्यकर्ते आणि प्रशासनाने झोपेचे सोंग घेऊ नये : पप्पू कागदे

बीड स्पीड न्यूज 



बीड शहरातील पाणीप्रश्नी रिपाइं आक्रमक; पालिका राज्यकर्ते आणि प्रशासनाने झोपेचे सोंग घेऊ नये : पप्पू कागदे


बीड / प्रतिनिधी-:उन्हाची दाहकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. असे असतांना मात्र बीड नगर पालिकेकडून पिण्याच्या पाण्याचे कोणतेही नियोजन होताना दिसून येत नाही. परिणामी नियमित पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतो आहे. शहराला एक एक महिना पाणी मिळत नाही. पिण्याचे पाणी हा अत्यंत गरजेचा प्रश्न आहे. त्यामुळे  बीड पालिका राज्यकर्ते आणि प्रशासनाने झोपेचे सोंग घेऊ नये, तुमची नौटंकी बाजूला सारून बीड नगर पालिकेने आधी पाण्याची सोय करावी, अशी मागणी घेवून रिपाइंने सोमवार (ता.4) बीड पालिकेच्या दारात आंदोलन करून पाणी प्रश्नी आक्रमक पवित्रा घेतला. दरम्यान युवा रिपाइं प्रदेश अध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांनी 

नगर पालिका प्रशासनास चांगलेच धारेवर धरले.
बीड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या  जलाशयामध्ये मुबलक पाणी साठा आहे. असे असतांना शहराला नियमित पाणी पुरवठा करण्यात बीड पालिका पूर्णपणे फेल ठरली आहे. उन्हाळ्याचे दिवस असतांना देखील नागरिकांना दररोज पाणी मिळण्याऐवजी महिना महिना पाणी मिळत नाही. शहरासह शासकीय कार्यालये, बसस्थानक, सार्वजनिक ठिकाणच्या पाणपोई याठिकाणी देखील पाणी नाही. बीड पालिकेचा हा सफसेल नाकर्तेपणा आहे. त्यामुळे पाण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे.  बीड पालिकेने कुठलेही कारण पुढे न करता दररोज पाणी पुरवठा करावा. बीड नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी आंदोलने करावे लागत असतील तर पालिका राज्यकर्ते आणि प्रशासन नेमकं काय काम करते आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करून दिवसाआड नाही तर दररोज पाणी पुरवठा करावा,अन्यथा पुन्हा आंदोलन केले जाईल असा इशारा युवा रिपाइं प्रदेश अध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांनी बीड 

पालिका प्रशासनास दिला. या आंदोलनात राजू जोगदंड, किसन तांगडे, महेश आठवले, अविनाश जोगदंड, प्रभाकर चांदणे, विलास जोगदंड, चेतन चक्रे, भैय्या मस्के, सचिन वडमारे, बप्पा जावळे ,महेंद्र वडमारे, मिलिंद पोटभरे, मायाताई मिसळे,मंगल जोगदंड, धम्मा पारवेकर, भास्कर जावळे,भाऊसाहेब दळवी,पप्पू वडमारे, कपिल इनकर, गणेश वाघमारे, नवनाथ डोळस, राजू कांबळे,आप्पा मिसळ, प्रा. राहुल सोनवणे,अरुण कुमार ,के.के. कांबळे,कालिदास ओव्हाळ, नितीन सोनकांबळे ,आनंद ओव्हाळ ,संतोष गुंजाळ, प्रतिक काकडे, शेख हुसेन, राज काकडे, बाबू जाधव, भैय्या साळवे,विशाल मिसळे , आनंद वीर, अमोल अहिरे,राजू डोळस, कार्तिक वाघमारे, गणेश राजपूत ,सचिन इगडे, निखिल वाघमारे, मनोज शिंदे, अनिल वीर, विजय डोळस यांच्यासह आदी रिपाइं कर्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा