Subscribe Us

header ads

महावितरण कंपनीचा मनमानी कारभार; लाईट कधी सुरळीत देत नाहीत पण बिल वसुली मात्र सक्तीने

बीड स्पीड न्यूज 

प्रतिनिधी नवनाथ गोरे 

महावितरण कंपनीचा मनमानी कारभार; लाईट कधी सुरळीत देत नाहीत पण बिल वसुली मात्र सक्तीने 


वाकनाथपुर प्रतिनिधी-:बीड तालुक्यातील महावितरण कंपनीने आपला मनमानी कारभार चालु केला आहे. लाईट कधी सुरळीत देत नाहीत पण बिल वसुली मात्र सक्तीने करण्यात येत आहे. बीड तालुक्यातील ग्रामीण भागात लाईट कधीच सुरळीत नसते. शेतकऱ्यांचे पीके जोमात आली की बिले वसुलीच्या नावाने विद्युत पुरवठा बंद केला जातो. विद्युत पुरवठा बंद केल्याने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास काढून घेतला जातो आणि सर्व पीक पाण्याअभावी जळून जाते अश्याचा प्रकारे तालुक्यातील खांडे पारगाव. नागापुर (खु) उमरद 

खालसा. अंथरवर पिंप्री. उमरी. नागापूर (बु).अंथरवर पिंप्री तांडा सात गावातील लाईट पुरवठा चार महिन्यांपासून सुरळीत नाही शेतातील सगळे पिके जळून खाक झाली लाईट चांगली मिळावी जुन्या तारा बदलून नवीन तारा टाकाव्यात अश्या विविध मागण्यासाठी आज दिनांक ४ एप्रिल वार सोमवार रोजी जालना रोड येथील एमएससीबी कार्यालय येथे राजेंद्र आमटे यांच्या नेतृत्वाने लोकशाही पद्धतिने जोरदार आंदोलन करण्यात आले.कार्यालयाचे अधीक्षक , अभियंता, यांच्या कडून पाच दिवसांत लाईट सुरळीत होईल असे लेखी आश्वासन घेतले.या वेळी सात गावातील नागरिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा