Subscribe Us

header ads

कुक्कडगाव येथे जयभिम महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

बीड स्पीड न्यूज 


प्रतिनिधी नवनाथ गोरे

कुक्कडगाव येथे जयभिम महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
  


वाकनाथपुर प्रतिनिधी-:बीड तालुक्यातील कुक्कडगाव येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षीविश्वरत्न,बोधीसत्व,महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त जयभिम महोत्सव मोठ्या ऊत्साहात साजरा होत आहे.कुक्कडगाव येथे प्रतिवर्षी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध ऊपक्रमाने आणि अतिशय ऊत्साहाने साजरी केली जाते.याही वर्षी ऊत्सव समितीच्या वतीने विविध ऊपक्रम राबवण्यात येत आहेत.यामध्ये दि.२६एप्रिल रोजी सकाळी ८ ते११ या वेळेत स्वच्छता अभियान व सायंकाळी ७:००वा प्रा.बापूसाहेब शिंदे यांचे चला महापूरुषांचे विचार समजून घेऊ या विषयावर व्याख्यान आणि शिक्षण घेऊन विविध पदावरील कार्यरत असणार्‍या होतकरु तरुणांचे सत्कार होतील.तसेच दि.२७ एप्रिल रोजी सकाळी ८ते११ या वेळेत विविध ठिकाणी वृक्षारोपण व सायंकाळी ७:००वा प्रा.दिपक जमधाडे प्रस्तुत परिवर्तनवादी बुध्द भिमगीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम व शालेय स्तरावर घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण होईल.दि.२८ एप्रिल गुरुवार रोजी श्रावस्ती बौध्दविहार येथे दुपारी १ते ३ भोजनदान  व सायंकाळी ६ वा.डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक निघेल.या विविध कार्यक्रमांचा सर्वांनी लाभ घ्यावा असे अवाहन ऊत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा