Subscribe Us

header ads

आ.क्षीरसागरांच्या निवासस्थानी ना.जयंत पाटील,ना.राजेश‌ टोपेंची सांत्वन भेट

बीड स्पीड न्यूज 


आ.क्षीरसागरांच्या निवासस्थानी ना.जयंत पाटील, ना.राजेश‌ टोपेंची सांत्वन भेट


बीड (प्रतिनिधी):- बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप भैय्या क्षीरसागर यांच्या मातोश्रींचे तीन दिवसांपूर्वी दुखःद झाले होते.यामुळे  राष्ट्रवादीचे 
प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री ना.जयंत पाटील व राज्याचे आरोग्यमंत्री ना.राजेश टोपे यांनी रविवार दि.24 

एप्रिल रोजी भेट आ.संदीप क्षीरसागर यांच्या निवासस्थानी भेट देऊन क्षीरसागर कुटुंबीयांचे सांत्वन केले.आ.संदीप भैय्या क्षीरसागर यांच्या मातोश्री तथा बीड जि.प.सदस्या रेखाताई क्षीरसागर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने बुधवार दि.21 एप्रिल रोजी दुःखद निधन झाले 

होते. या अनुषंगाने आज रविवार (दि.24) रोजी राष्ट्रवादी-कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील व राज्याचे आरोग्यमंत्री ना.राजेश टोपे यांनी आ.संदीप भैय्या क्षीरसागर यांच्या निवासस्थानी भेट घेतली.यावेळी त्यांनी रेखाताई क्षीरसागर यांना श्रद्धांजली अर्पण केली व क्षीरसागर कुटुंबीयांचे सांत्वन 

केले.दरम्यान पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर ते हेलीकॉप्टरने ना.जयंत पाटील व ना.राजेश टोपे यांचे आगमन झाले होते.यानंतर मोटारीने ते 'क्षीरसागर निवास' याठिकाणी पोहचले.यावेळी त्यांच्यासमवेत माजी आ.सुनील धांडे, माजी आ.सय्यद सलीम,माजी आ.उषा दराडे आदी उपस्थित होते. यावेळी पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा