Subscribe Us

header ads

युवक संपर्क अभियानाची उद्यापासुन मराठवाड्यात सुरूवात युवक प्रदेशध्यक्ष सुरेंद्रभैय्या कावरे यांचा झंजावती दौरा

बीड स्पीड न्यूज 


युवक संपर्क अभियानाची उद्यापासुन मराठवाड्यात सुरूवात
युवक प्रदेशध्यक्ष सुरेंद्रभैय्या कावरे यांचा झंजावती दौरा




परळी (प्रतिनिधी): महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने मराठवाड्यामध्ये संपर्क अभियान राबविण्यात येणार आहे समाज संघटनेची बांधणी समाजाचे ज्वलंत प्रश्न महाराष्ट्र नाभिक महामंडळ पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून महाराष्ट्र महाराष्ट्र नाभिक महामंडळ युवक संघटन, महिला आघाडी, महाराष्ट्र नाभिक महामंडळ कर्मचारी संघटना, जिल्हा शाखा,तालुका शाखा,शहर शाखा व सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी चर्चा करुन सामाजिक, राजकीय, शैक्षणिक समस्यावर विचार मंथन करून पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे कोरोना काळामध्ये नाभिक समाजाला अनेक संकटांचा सामना करावा लागला आहे व अनेक कार्यकर्त्यांना आपला जीव गमवावा लागला या समाजाच्या प्रश्नासाठी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष ओबीसीचे नेते कल्याणजी दळे साहेब यांच्या आदेशाने मराठवाड्यामध्ये संपर्क अभियान राबवण्यात येणार आहे तरी पदाधिकार्यांनी जिल्हा कार्यकारणी तालुका कार्यकारणी शहर कार्यकारणी कर्मचारी युवक या सर्व पदाधिकार्यांनी बैठकीस येताना आपला अहवाल सोबत आणणे गरजेचे आहे ज्या ज्या ठिकाणी फेरबदल करायचे आहेत त्यावरही चर्चा करण्यात येणार आहे या संपर्क अभियानामध्ये महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे कार्याध्यक्ष दामोदर काका बिडवे, प्रदेश सरचिटणीस पांडुरंगजी भवर, महाराष्ट्र नाभिक महामंडळ युवक प्रदेशाध्यक्ष सुरेंद्र भैय्या कावरे, कर्मचारी प्रदेशाध्यक्ष उत्तमराव सोलानी, महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष भारतीताई सोनवणे या मार्गदर्शन करणार आहेत तरी दि.२५एप्रिल रोजी सकाळी ११वा. शासकीय विश्रामगृह जालना,दि.२५एप्रिल दुपारी २वा. शासकीय विश्रामगृह बीड, दिनांक २६ एप्रिल रोजी दुपारी२ वा. शासकीय विश्रामगृह उस्मानाबाद, दि.२७ एप्रिल रोजी दुपारी १ वा. शासकीय विश्रामगृह लातूर,दि.२८एप्रिल रोजी दुपारी१ वा. नांदेड जिल्ह्यातील कवठा येथे संतसेना महाराज सभागृहात,दि.२९ एप्रिल रोजी दुपारी १ वा. शासकीय विश्रामगृह हिंगोली, दि.३० मे रोजी दुपारी १वा. शासकीय विश्रामगृह परभणी येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे तरी मराठवाड्यातील जिल्हा शाखा, तालुका शाखा, शहर शाखा, युवक युवक आघाडी, कर्मचारी संघटना, महिला आघाडी सर्व पदाधिकार्यांनी वेळेमध्ये उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र नाभिक युवक महामडळाचे युवक प्रदेशाध्यक्ष सुरेंद्र भैय्या कावरे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा