Subscribe Us

header ads

पाणी टंचाई चा प्रश्न जरी गंभीर असला तरी हा तुमचा लहान भाऊ खंबीर आहे--- प्रदिप नेहरकर

बीड स्पीड न्यूज 


पाणी टंचाई चा प्रश्न जरी गंभीर असला तरी हा तुमचा लहान भाऊ खंबीर आहे--- प्रदिप नेहरकर

पवित्र रमजान निमीत्त प्रदिप नेहरकर यांनी केले मोफत पाणी वाटप

किल्ले धारूर/प्रतिनिधी-:धारूर शहराला मागील काही महिन्यापासून दहा ते पंधरा दिवसानंतर नळाला पाणी येत आहे तर काही ठिकाणी महिन्याच्या अंतराने पाणी येत असल्याने नागरिक पाण्यासाठी वणवण भटकत आहेत. त्यातच मुस्लिम समाज बांधवांचा रमजान सुरू असल्याने त्यांनाही पाणीटंचाईला सामोरे जावं लागत आहे. नागरिकांची हीच अडचण लक्षात घेऊन येथील संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य प्रदीप नेहरकर यांनी शहरातील प्रभाग एक मध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा शुभारंभ केला न असल्याने प्रभागातील नागरिकांमधून समाधान व्यक्त केली जात आहे.शहरात पिण्याच्या पाण्यासह सांड पाण्यासाठी नागरिकांना मोठ्या अडचणीस सामोरे जावे लागत आहे. दहा पंधरा दिवसानंतर ही नळास नियमित पाणी सुटत नसल्याने नागरिकांना खाजगी टँकरद्वारे पाणी विकत घ्यावे लागत आहे किंवा इतरत्र वणवण भटकंती करण्याची वेळ आली आहे. सध्या मुस्लिम समाज बांधवांचा रमजान महिना सुरू असल्याने यांना उत्सव साजरा करण्यापेक्षा पाणी प्रश्न आडचानीस सामोरे जावे लागत आहे. हीच अडचण लक्षात घेऊन येथील प्रभाग एक मध्ये प्रदीप नेहरकर यांच्याकडून मोफत टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या कार्याचा शुभारंभ माजी नगराध्यक्ष माधव निर्मळ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सय्यद शाकेर, नितिन शिनगारे, मदन धोतरे, दत्ता गोंदणे, गौतम चव्हाण, शौकत शहा, नागेश शिनगारे, शेख शाकेर, शेख अनवर, गणेश थोरात, विश्वास शिनगारे, शेख शाहेद,शेख रहीम, हनुमंत अंधारे, बाबासाहेब शेळके, स्वानंद मस्के, महेश गवळी, सुनिल गैबी इत्यादी जण उपस्थित होते.


सध्याच्या पाणीटंचाईच्या सामान्य नागरिकांना तीव्र झळा बसत आहेत. विशेषतः महिला वर्गास याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. हीच अडचण लक्षात घेऊन प्रभाग १ मध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे या प्रभागात नियमित दोन टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा