Subscribe Us

header ads

औरंगाबाद मध्ये राज ठाकरेंच्या सभेला परवानगी नाहीच!

बीड स्पीड न्यूज 


औरंगाबाद मध्ये राज ठाकरेंच्या सभेला परवानगी नाहीच!


औरंगाबाद-: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेचं आयोजन 1 मे रोजी करण्यात आलं आहे. मनसेकडून या सभेसाठी परवानगी मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र अद्यापही या सभेला परवानगी मिळालेली नाही. राज ठाकरेंच्या सभेसाठी परवानगी मागून आठ दिवस उलटले आहेत. मात्र आता महाराष्ट्र दिनी होणाऱ्या या सभेला पोलिसांनी परवानगी न दिल्यामुळे आता नेमकं काय होतं, हे पाहणं महत्त्वाचं आहे. मनसे सभा घेण्यावर ठाम आहे. औरंगाबादमध्ये नियोजित ठिकाणीच ही सभा व्हावी, या मागणीवर मनसे ठाम आहे. तर दुसरीकडे सभेला परवानगी मिळाली नाही, तर काय? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. या प्रश्नाचं उत्तर मंत्री रावसाहेब दानवे यांनी पत्रकारांशी बोलताना दिलंय.पोलीस परवानगी नाही दिली तरी राज ठाकरे सभा घेणारच, असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला पोलीस परवानगी देत नसल्याच्या प्रश्नावर राव साहेब दानवे पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी हे उत्तर दिलंय. परवानगी नाही दिली तरी राज ठाकरे सभा घेतल्याशिवाय राहणार नाहीत, असं वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केलंय.दरम्यान, पोलिसांनी मनसेच्या नियोजित सभा रमजान ईदनंतर घेतली जावी, असा सल्ला मनसे यांना दिला आहे. नियोजित ठिकाणी सभा घ्यायची असेल, तर सभेची तारीख बदलावी असं पोलिसांचं म्हणणंय आहे. तर दुसरीकडे मनसे मात्र नियोजित ठिकाणीच सभा व्हावी, यासाठी कामाला लागली आहे. आता परवानगी मुद्द्यावरुन औरंगाबादचं राजकारण तापलंय.3 मे पर्यंत मशिदींवरील भोंगे हटवण्याचा इशारा राज ठाकरेंनी सरकारला दिला त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी औरंगाबादेतील सभेत जे भाषण करतील, त्यानंतर वातावरण आणखी तापेल, अशी भीती व्यक्त केली जातेय. त्यामुळेही राज ठाकरेंच्या 1 मे रोजी आयोजित केलेल्या सभेला परवानगी अद्यापतरी देण्यात आलेली नाही. महाराष्ट्र दिनी औरंगाबादमधील ऐतिहासिक मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर राज ठाकरेंची सभा व्हावी, यासाठी मनसेचे पदाधिकारी आग्रही आहेत.दरम्यान, राज ठाकरे यांच्या ठाण्यातील उत्तर सभेलाही पोलिसांनी परवानगी नाकारली होती. औरंगाबादमध्येही अनेक राजकीय संघटनांनी राज ठाकरेंच्या सभेला विरोध केला आहे. राज ठाकरे यांच्या सभेला विरोध करत मुस्लिम नुमाइंदा कौंसिल, वंचित बहुजन आघाडी, मौलाना आझाद विचार मंच, ऑल इंडिया पँथर सेना, प्रहार जनशक्ती पक्ष, गब्बर अ‍ॅक्शन संघटना आदींनी पोलीस आयुक्तांना यासाठीचे निवेदन दिले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा