Subscribe Us

header ads

भिंतीखाली दबून झालेल्या बालिकेचा मृत्यू प्रकरणी; माजलगाव न.प. मुख्याधिकाऱ्यांसह पाच जणांवर गुन्हा दाखल

बीड स्पीड न्यूज 

भिंतीखाली दबून झालेल्या बालिकेचा मृत्यू प्रकरणी; माजलगाव न.प. मुख्याधिकाऱ्यांसह पाच जणांवर गुन्हा दाखल

माजलगाव प्रतिनिधी-: नगर परिषदेच्या जेसीबी मशीनने पाडलेल्या संरक्षक भिंतीखाली दबून सहा वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी (दि. 28) माजलगाव मधील इदगाह मैदानावर घडली होती. याप्रकरणी माजलगाव न.प. मुख्याधिकारी विशाल भोसले, स्वच्छता विभाग प्रमुख जगदीश जाधवर, स्वच्छता कंत्राटदार, जेसीबीचा चालक आणि मालक अशा पाच जणांवर हयगयीने मृत्यूस कारणीभूत ठरल्याने 279,304,अ 34,134, प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.ईकरा सय्यद निसार (वय ६) असे त्या मृत चिमुकलीचे नाव आहे. तिचे वडील सय्यद निसार सय्यद नूर यांच्या फिर्यादीनुसार, गुरुवारी दुपारी ईकरा खेळण्यासाठी इदगाह मैदानात गेली होती. साडेचार वाजताच्या सुमारास नगर पालिकेने पाठविलेल्या जेसीबीचा ऑपरेटर महादेव अण्णासाहेब जाधव (रा. गौतमनगर, माजलगाव) हा कोणतीही पूर्व कल्पना न देता त्या ठिकाणी जेसीबी घेऊन आला. काम करताना देखरेख ठेवण्यासाठी सोबत कोणीही नसताना आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना न करता त्याने स्वच्छतेचे काम करण्यास सुरुवात केली. यावेळी तो मागेपुढे न पाहता निष्काळजीपणे जेसीबी चालवत होता. त्यामुळे जेसीबीच्या धक्क्याने संरक्षक भिंत पडली. नेमके त्याच वेळी तिथून घराकडे निघालेल्या ईकराच्या अनावर ही भिंत पडली आणि त्याखाली दबून तिचा जागीच मृत्यू झाला होता. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा