Subscribe Us

header ads

पंकज देशमुख यांच्याकडे बीडच्या पोलिस अधीक्षक पदाचा अतिरिक्त पदभार!

बीड स्पीड न्यूज 


पंकज देशमुख यांच्याकडे बीडच्या पोलिस अधीक्षक पदाचा    अतिरिक्त पदभार!

बीड प्रतिनिधी-: बीडच्या पोलिस अधीक्षक पदाचा अतिरिक्त पदभार पुणे सीआयडीचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांच्याकडे देण्यात आला आहे. गृह विभागाने याबाबत शुक्रवारी आदेश काढले. बीडचे पोलिस अधीक्षक आर. राजा यांची पुणे शहर पोलिस उपायुक्त पदावर बदली झाल्यानंतर बीडचे पोलिस अधीक्षकपद रिक्त आहे. सध्या अतिरिक्त पोलिस अधीक्षक सुनिल लांजेवार यांच्याकडे प्रभारी पदभार होता. दरम्यान, शुक्रवारी गृह विभागाने रिक्त पोलिस अधीक्षकपदाचा पदभार इतर आयपीएस अधिका-यांकडे देण्याचा निर्णय घेतला. यात पुणे सीआयडीचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांच्याकडे बीडच्या पोलिस अधीक्षक पदाचा पदभार सोपवला गेला आहे. शनिवारी ते पदभार स्वीकारणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. देशमुख यांनी यापूर्वी उस्मानाबाद येथे पोलिस अधीक्षक म्हणून काम केले असल्याने त्यांना मराठवड्याच्या कामाचा अनुभव आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा