Subscribe Us

header ads

पत्नीसह दोन मुलांना दहा वर्षांपासून घरात डांबून ठेवले; पोलिसांच्या उपस्थितीत सामाजिक कार्यकर्त्या ऍड. संगीता धसे यांनी केली सुटका

बीड स्पीड न्यूज 

पत्नीसह दोन मुलांना दहा वर्षांपासून घरात डांबून ठेवले; पोलिसांच्या उपस्थितीत सामाजिक कार्यकर्त्या ऍड. संगीता धसे यांनी केली सुटका


बीड प्रतिनिधी-: चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीसह आपल्या दोन मुलांना गेल्या 10 वर्षांपासून घरामध्ये डांबून ठेवले. या घटनेची माहिती महिलेच्या बहिणीने बीड शहरातील सामाजिक कार्यकर्त्या ऍड. संगीता धसे यांना दिल्यानंतर धसे यांनी शिवाजीनगर पोलिसांच्या मदतीने आज सकाळी महिलेच्या घरी जावून तिची सुटका करत दोन मुलांना व महिलेला बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.मनोज किन्हीकर कुलकर्णी रा. जालना रोड हा आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता.या संशयातून त्याने पत्नी रुपाली किन्हीकरसह दोन मुलांना गेल्या दहा वर्षांपासून घरामध्येच डांबून ठेवले. या घटनेची माहिती रुपाली किन्हीकर यांच्या बहिणीने काल बीड शहरातील सामाजिक कार्यकर्त्या ऍड. संगीता धसे यांना दिल्यानंतर धसे यांनी शिवाजीनगर पोलिसांना या घटनेबाबत माहिती दिली व पोलिसांना सोबत घेऊन त्या महिलेच्या घरी गेल्या महिलेसह दोन मुलांना घरामध्ये डांबून ठेवण्यात आले होते. या तिघांना बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये आणण्यात आले. घरामध्ये डांबून ठेवल्याने महिलेची प्रकृती अत्यंत खालावली होती.या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक