Subscribe Us

header ads

समाज माध्यमांच्या आक्रमणासमोर वृत्तपत्रे विश्वासार्हतेमुळे टिकून आहेत- पंकजाताई मुंडे

बीड स्पीड न्यूज 


समाज माध्यमांच्या आक्रमणासमोर  वृत्तपत्रे विश्वासार्हतेमुळे  टिकून आहेत- पंकजाताई मुंडे

अ.भा.मराठी पत्रकार परिषद संलग्न, परळी शहर व तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण सोहळा थाटात संपन्न


परळी, (प्रतिनिधी):-देशाच्या जडणघडणीत वृत्तपत्रांचा खूप मोठा वाटा असून अन्याय अत्याचारांच्या विरोधात व विकासासाठी आग्रही पत्रकारिता केली गेली आहे. समाज माध्यमे कितीही वाढली तरी वृत्तपत्रांची विश्वासार्हता कायम आहे. असे मत माजी मंत्री तथा भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केले. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न परळी शहर व तालुका पत्रकार संघाच्या वतीने आयोजित दर्पण पुरस्कार वितरण कार्यक्रमात माजी मंत्री पंकजाताई मुंडे बोलत होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार तथा दैनिक पुढारी चे प्रतिनिधी लक्ष्मण वाकडे तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, वैद्यनाथ बँकेचे माजी अध्यक्ष विकासराव डुबे, दीनदयाल बँकेचे उपाध्यक्ष एडवोकेट राजेश्वर देशमुख, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरुण गुट्टे, मनसेचे शहराध्यक्ष वैजनाथ कळसकर, पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष बालकिशन सोनी शहराध्यक्ष जगदीश शिंदे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. ज्येष्ठ सामाजिक नेते तथा दैनिक मराठवाडा साथी चे संपादक चंदुलाल बियाणी, दैनिक जगमित्र चे संपादक बाळासाहेब 

कडबाने, परळी समाचार चे संपादक आत्मलिंग शेटे, वैद्यनाथ वार्ताचे संपादक रामप्रसाद गरड, परळी प्रहारचे संपादक राजेश साबणे, झुंजार नेता चे प्रतिनिधी प्रकाश चव्हाण, दैनिक दिव्या लोकप्रभा चे उपसंपादक अनंत कुलकर्णी, महाराष्ट्र प्रतिमा चे वृत्त संपादक अनुपकुमार कुसुमकर, लोकमतचे तालुका प्रतिनिधी संजय खाकरे, पुण्यनगरी चे तालुका प्रतिनिधी धनंजय आरबुने, दै.सोमेश्वर साथी चे संपादक बालासाहेब फड तसेच याच एच.डब्ल्यू न्युज चॅनलच्या बीड जिल्हा प्रतिनिधी सुकेशनी नाईकवाडे यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शाल-श्रीफळ, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. याच कार्यक्रमात अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ह.भ.प रामेश्वर महाराज कोकाटे, सार्थ विवेकसिंधु ग्रंथांचे विवेचन करणारे ह.भ.प दत्तात्रय महाराज आंधळे तसेच गीत गायनाने सर्वांना मंत्रमुग्ध करणारे सुभाष शेप,गायिका मयुरी यांचा पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.आपल्या भाषणात पुढे बोलताना माजी मंत्री सौ. पंकजाताई मुंडे म्हणाल्या की विकास ही एक प्रक्रिया असून त्यासाठी लोकप्रतिनिधी जेवढे आग्रही असतात तेवढेच वृत्तपत्र आणि त्यांचे प्रतिनिधी सुद्धा आग्रही असतात.  परळी शहराच्या विकासासाठी मी राष्ट्रीय महामार्ग दिला. वैद्यनाथ मंदिराच्या विकासासाठी निधी सुद्धा दिला. ही आमची जबाबदारी होती. ती आम्ही पार पाडली परंतु मागील काही वर्षात कोरोना व इतर अडचणीमुळे विकासाची प्रक्रिया थांबल्याचे दिसत असल्याचे त्या म्हणाल्या. मी भाजप प्रभारी म्हणून मध्य प्रदेशात असलेल्या महाकालेश्वर व ओंकारेश्वर मंदिराला काही वेळा भेट दिली. आपल्या इथे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक प्रभू वैद्यनाथ मंदिर आहे. देशभरातून येथे भाविक यावेत त्यांना आवश्यक असलेल्या सुविधा मिळत राहाव्यात यासाठी आम्ही तीर्थक्षेत्र विकास योजना आणली इतर ठिकाणचा विकास जसा देवस्थान परिसरात पाहायला मिळतो. तसाच भविष्यात परळीत ही मिळावा. अशी अपेक्षा पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केली.दरम्यान परळी शहरातील पत्रकार सातत्याने विकास कामावर लेखणी चालवतात असे सांगून टीकाटिप्पणी पेक्षा 

वास्तविक लिखाणावर असलेला त्यांचा भर कौतुकास्पद असल्याचे त्या म्हणाल्या. सर्व पुरस्कार प्राप्त पत्रकारांनी सपत्नीक हा पुरस्कार स्वीकारला हे पाहून पंकजाताई मुंडे म्हणाल्या की परिवारासह आलात याचा मला खूप आनंद वाटला. असाच एकोपा कायम ठेवा गरजेच्या ठिकाणी मी सोबत असेल असेही त्या म्हणाल्या.अध्यक्षीय समारोपात ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मण वाकडे यांनी परळी शहरातील पत्रकारिता काल, आज आणि उद्या अत्यंत सोप्या व पूर्व अनुभवाला समोर ठेवत मांडणी केली. पूर्वी बातम्या आम्हीच लिहायचो, टपालाने पाठवायचे आणि पेपरचे गठ्ठे आल्यानंतर स्वतः त्याचे वितरण करीत होतो. आता काळ बदलला नवे तंत्रज्ञान आले आहे. परंतु पत्रकारितेची खरी मजा आणि त्याचा आनंद हा वृत्तपत्रातच आहे. असेही लक्ष्मण वाकडे म्हणाले.सर्व पाहुण्यांचे स्वागत पत्रकार संघाचे अध्यक्ष बालकिशन सोनी शहराध्यक्ष जगदीश शिंदे यांच्यासह उपस्थित मान्यवर पत्रकारांनी केले. कार्यक्रमास नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष बालकिशन सोनी तर आभार शहराध्यक्ष जगदीश शिंदे व संचालन प्रशांत प्र. जोशी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्येष्ठ पत्रकार ओमप्रकाश बुरांडे, संपादक शिवशंकर झाडे, भगवान साकसमुद्रे, धीरज जंगले, सचिन मुंडे, पद्माकर मुजमुले, कैलास डुमणे, राजकुमार कदम, आकाश सोनी, आनंद हाडबे, गणेश कोडे, आदिंनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा