Subscribe Us

header ads

समता प्रतिष्ठानचे पत्रकारिता पुरस्कार दयानंद माने व संजय मालाणी यांना जाहीर

बीड स्पीड न्यूज 


समता प्रतिष्ठानचे पत्रकारिता पुरस्कार दयानंद माने व संजय मालाणी यांना जाहीर

बीड, दि. १२ (प्रतिनिधी) : येथील समता प्रतिष्ठान मार्फत दिला जाणारा सत्यशोधक महात्मा फुले पत्रकारिता पुरस्कार ‘सकाळ’चे मराठवाडा आवृत्तीचे निवासी संपादक दयानंद माने व येथील पत्रकार संजय मालानी यांना जाहीर झाला.समता प्रतिष्ठान २१ वर्षांपासून आरोग्य, साक्षरता, आर्थिक - वित्तीय स्वावलंबन, सामाजिक व आर्थिक समता, महिला उद्योजकता विकास, लोकशाही, सर्व धर्म समभाव, महिला सक्षमीकरण, विज्ञान प्रसार व वाचन चळवळ,  कौटुंबिक सल्ला व समस्या निवारण इत्यादी क्षेत्रात कार्यरत आहे.पत्रकारिता हा लोकशाहीत चौथा स्तंभ म्हणून ओळखला जातो. समाज जडणघडणीत, प्रगतीत व चिरस्थायी विकासात पत्रकारांचा मोठा सहभाग असतो. या बाबीचा विचार करीत संवेदनशील व प्रगतीशील पत्रकारांचा त्यांच्या कार्याबद्दल गौरव करावा या हेतूने समता प्रतिष्ठानने दरवर्षी महात्मा फुले जयंतीनिमित्त सत्यशोधक महात्मा फुले पत्रकारिता पुरस्कार प्रदान करते. यंदाचा पुरस्कार ‘सकाळ’ मराठवाडा आवृत्तीचे निवासी संपादक दयानंद माने व संजय मालानी यांना जाहीर दिला जाणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष त्र्यंबक हरगंगे यांनी दिली.दयानंद माने विद्यार्थी दशेपासून विविध चळवळीत सक्रिय आहेत. सामाजिक उत्कर्षाच्या हेतूने ते पत्रकारितेत आले. वीस वर्षांंच्या पत्रकारितेत त्यांनी विविध ठिकाणी पत्रकारितेच्या विविध महत्वाच्या पदांवर काम केले. महिला, मुले, युवक व  सामाजिक चळवळीतील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार घोषित झाला. संजय मालाणी देखील पत्रकारीते सोबतच विज्ञान, वाचन, लोकशाही, समाजवाद तसेच अंधश्रध्दा निर्मूलन, राष्ट्र सेवा दल या चळवळीत क्रियाशील आहेत. एक मे रोजी कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त पुरस्काराचे वितरण होईल. सन्मान चिन्ह,  प्रशस्तीपत्र व पाच हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरुप आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा