Subscribe Us

header ads

कौटुंबिक वादातून पतीने पत्नीला विहिरीत ढकलले

बीड स्पीड न्यूज 


कौटुंबिक वादातून पतीने पत्नीला विहिरीत ढकलले

बीड -: पैशाच्या कारणावरून पतीने पत्नी आणि दोन मुलांना मारहाण करून पत्नीला विहिरीत ढकलून दिल्याची धक्कादायक घटना बीड तालुक्यातील सोनगाव येथे उघडकीस आली आहे. केवळ पत्नीला विहिरीत ढकलूनच तो थांबला नाही, तर त्याने वरून तिच्यावर दगड फेकून मारला. सुदैवाने पत्नी बचावली असून पतीवर गुन्हा दाखल झाला आहे.सदरील घटना ७ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता घडली होती. गोविंद गुलाब घिगे (रा. सोनगाव) असे त्या आरोपीचे नाव आहे. गोविंदची पत्नी सुवर्णा (वय ३९) यांच्या फिर्यादीनुसार, ७ एप्रिल रोजी पैशाच्या कारणावरून त्या दोघात वाद झाला. यावेळी संतापलेल्या गोविंदने पत्नी सुवर्णा आणि दोन्ही मुलांना बेदम मारहाण केली आणि जीवे मारण्याच्या उद्देशाने सुवर्णाला घराशेजारी असलेल्या विहिरीत ढकलून दिले. एवढ्यावरच गोविंद थांबला नाही. नंतर त्याने सुवर्णा विहिरीतील पाण्यात असताना वरून तिच्यावर दगड मारला. यात ती गंभीर जखमी झाली. सदर फिर्यादीवरून गोविंद घिगे याच्यावर सोमवारी (दि. ११) बीड ग्रामीण ठाण्यात कलम ३०७, ३३८, ३२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पीएसआय राजपूत हे करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा