Subscribe Us

header ads

स्व. नितिन जाधव मंडळ आधिकारी यांच्या संशयास्पद अपघात मृत्युप्रकरणात कार्यवाहीबाबत उपआयुक्तांचे जिल्हाधिका-यांना निर्देश:-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

बीड स्पीड न्यूज 

स्व. नितिन जाधव मंडळ आधिकारी यांच्या संशयास्पद अपघात मृत्युप्रकरणात कार्यवाहीबाबत उपआयुक्तांचे जिल्हाधिका-यांना निर्देश:-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर 
____
बीड प्रतिनिधी-:बीड तालुक्यातील म्हाळसजवळा म्हाळसजवळा येथील मंडळ आधिकारी स्व.  नितिन जाधव यांच्या संशयास्पद अपघात प्रकरणात पोलीस उपअधिक्षक पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र कमिटीमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी विभागीय आयुक्यांना केल्यानंतर उप आयुक्त(महसुल) विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद, पराग सोमण यांनी जिल्हाधिकारी बीड यांना तक्रारीतील नमुद मुद्यावर चौकशी करून नियमानुसार आवश्यक कार्यवाहीबाबत निर्देश दिलेले आहेत. 
 
सविस्तर माहीतीस्तव 
__
०६ मार्च २०२२ रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास बीडचे प्रभारी तहसिलदार सुरेंद्र डोके व म्हाळसजवळा ता.जि.बीड येथील मंडळ आधिकारी नितिन जाधव यांच्या गाडीचा सावळेश्वर फाटा याठीकाणी अपघात झाल्याचे व त्या दुर्देवी घटनेत मंडळ आधिकारी नितिन जाधव यांचा जागीच मृत्यु व तहसिलदार सुरेंद्र डोके जखमी झाले होते, दोघेही राक्षसभुवन, सावळेश्वर, म्हाळसपिंपळा येथे अवैध वाळु वाहतुक विरोधात कारवाईसाठी गस्त घालणा-या पथकात असल्याचे दैनिकात प्रसिद्ध झालेले असून गाडीवरील ताबा सुटल्याने अपघात झाल्याचे विविध दैनिकातुन प्रसिद्ध झाले आहे. 
संबधित प्रकरण संशयास्पद असुन अपघात की घातपात याविषयी सर्वसामान्य माणसांमध्ये शंका असुन तहसिलदार सुरेंद्र डोके यांनी राक्षसभुवन येथे जाण्यापुर्वी शासकीय नियमानुसार वरिष्ठांची परवानगी घेतली होती का?? गस्ती पथकामध्ये गेले होते तर मग शासकीय वाहनाद्वारे प्रवास न करता खाजगी वाहनाने प्रवास का??तसेच सोबत पोलीस बंदोबस्त का नव्हता? तहसिलदार डोके यांनी अपघाताची कल्पना वरिष्ठांना दिली होती का?? बीड जिल्हा रूग्णालयात सर्व सुविधा असताना पुण्याला त्यांना का हलवण्यात आले या सर्व गोष्टी संशयास्पद असुन संबधित प्रकरणात पोलीस उपअधिक्षक पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली उच्च स्तरीय स्वतंत्र कमिटीमार्फत चौकशी करण्यात यावी. तसेच तहसिलदार सुरेंद्र डोके यांचे त्या दिवशीचे सीडीआर तपासण्यात यावेत तसेच पाडळशिंगी टोलनाक्यावरील आवक जावक वाहनांचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येऊन व संबधित प्रकरणात चौकशी करून दोषींवर नियमानुसार आवश्यक कार्रवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. 

२५ दिवसानंतर जीपचालकावर गुन्हा दाखल 
_____
अवैध वाळु उपशावर कारवाईस गेलेल्या पथकातील कारला अपघात होऊन संशयास्पद रित्या मंडळ आधिकारी नितिन जाधव यांच्या कारला जीपने (क्रमांक  एमएच २३ -एके ४१००) धडक दिल्याची फिर्याद नितिन जाधव यांचे भाचे अभिषेक मारोती सावंत यांनी तक्रारीत नमूद केले होते त्या अनुषंगानेच २५ दिवसानंतर गेवराई ठाण्यात जीपचालकावर ३ एप्रिल रोजी गुन्हा दाखल झाला आहे. 

स्व. नितिन जाधव यांच्या संशयास्पद मृत्युप्रकरणात पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी मार्फत तपास करावा:-डाॅ.गणेश ढवळे 
____
बीड जिल्ह्य़ातील वाळुमाफियांवर पोलीस उपअधिक्षक पंकज कुमावत यांनी केलेल्या धडक कारवाई पाहता व तहसिलदार सुरेंद्र डोके यांची वादग्रस्त कारकीर्द पाहता पारदर्शकपणे अपघात कि घातपात या गोष्टीचा छडा लागण्यासाठी पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखालील स्वतंत्र कमिटीमार्फत तपास करण्यात यावा. 
 
डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर 
मो.नं.८१८०९२७५७२

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा