Subscribe Us

header ads

रक्तदान करा राष्ट्रीय एकात्मता वाढवा उपक्रम: बार्टी केंद्रात सीएस डॉ. सुरेश साबळे यांचे प्रतिपादन

बीड स्पीड न्यूज 

रक्तदान करा राष्ट्रीय एकात्मता वाढवा

उपक्रमबार्टी केंद्रात सीएस डॉ. सुरेश साबळे यांचे प्रतिपादन

बीड/ प्रतींनिधी-:रक्तदान करा आणि राष्ट्रीय एकात्मता वाढवाकारण रक्तदान हे श्रेष्ठदान आहे. त्याने एखाद्या माणसाचा जीव वाचतो. त्यामुळे समाजातल्या प्रत्येक व्यक्तीने रक्तदान करणे काळाची गरज आहे. असे आव्हानात्मक प्रतिपादन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह व समाज सुधारक महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंती निमित्त मंगळवार (ता. 12) रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराचे उद् घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांच्या हस्ते करण्यात आलेत्यावेळी उपस्थितांना रक्तदानाचे महत्व पटवून देताना डॉ. सुरेश साबळे बोलत होते.यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी ) मान्यताप्राप्तसम्राट प्रतिष्ठान उमरद खालसा संचलित छत्रपती राजर्षी शाहू महाराज स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रचे अध्यक्ष राहुल वाघमारेडॉ. बाळासाहेब जावळेसुनिल डोंगरे,केंद्र प्रमुख प्रा. यशवंत वावळ्करसहाय्यक केंद्र प्रमुख प्रा. अविनाश वडमारेग्रंथपाल सचिन काकडेअंबिका शिंदेप्रा. अमोल क्षीरसागरप्रा. शिवाजी रूपनरसचिन मेरूकरविनोद जोगदंडराहुल शिंदेमुकेश निसर्गंध,दीपालीताई निर्मळ  यांनी मोलाचे परिश्रम घेवून रक्तदान शिबिराचा कार्यक्रम यशस्वी केला. दरम्यान या रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमासाठी जिल्हा रूग्णालयातील डॉ. दीपाली कट्टेडॉ. राम आव्हाडरक्त संक्रमण अधिकारी बी. जे. नागरगोजेअंबादास जाधववैभव लोहार आदींची उपस्थिती होती. बार्टी केंद्रात स्पर्धा परीक्षांचे मोफत प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यानी व स्टाफने असे एकूण 16 रक्तदात्यांनी रक्तदान करून महामानवांना अभिवादन केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा