Subscribe Us

header ads

गुजरातने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा घेतला निर्णय;पंजाबच्या २ बाद ३४ धावा

बीड स्पीड न्यूज 


गुजरातने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा घेतला निर्णय;पंजाबच्या २ बाद ३४ धावा

IPL 2022 (8 एप्रिल) या हंगामात आज रोजी 16 वा सामना पंजाब किंग्ज विरूद्ध गुजरात टायटन्स असा खेळला जात आहे. आयपीएलच्या या हंगामात हे दोन्ही संघ पहिल्यांदाच एकमेकांविरूद्ध भिडत होत आहेत. हा सामना मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यात गुजरातने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या पंजाबला पहिला झटका बसला आहे. पंजाबने आतापर्यंत 4 षटकात 1 बाद 25 धावा केल्यात.गुजरातच्या संघात दोन बदल करण्यात आले. विजयशंकर आणि वरुण आरोन यांच्या जागेवर साईं सुदर्शन आणि दर्शन नालकंडे यांना संधी देण्यात आली आहे. पंजाबच्या संघात एक बदल करण्यात आला. भनुका राजपक्षेच्या जागेवर जॉनी बेयरस्टोला संधी देण्यात आली आहे.पंजाब किंग्ज गुणतालिकेत सध्या चौथ्या क्रमांकावर आहे, तर गुजरात टायटन्स तिसऱ्या क्रमांकावर आहे. पंजाबने आतापर्यंत 3 सामने खेळले असून त्यापैकी त्यांनी 2 सामन्यात विजय मिळवला. दुसरीकडे गुजरात टायटन्सने आतापर्यंत 2 सामने खेळले आणि दोन्ही सामने जिंकले आहेत. त्यामुळे एकीकडे गुजरातकडून आपली विजयाची हॅट्रिक करण्याचा प्रयत्न आहे, तर दुसरीकडे पंजाबचा देखील हा सामना जिंकून गुणतालिकेत स्थान मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा