Subscribe Us

header ads

आ.संदीप क्षीरसागरांच्या मागणीची उपमुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!भार नियमन टळणार,महावितरणला वीज खरेदी करण्यास मान्यता

बीड स्पीड न्यूज 


आ.संदीप क्षीरसागरांच्या मागणीची उपमुख्यमंत्र्यांनी घेतली  दखल!
भार नियमन टळणार,महावितरणला वीज खरेदी करण्यास मान्यता

बीड (प्रतिनिधी):-  मुस्लिम बांधवाचा पवित्र रमजान महिना सुरू झाला असून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव व हनुमान जयंती उत्सव देखील याच महिन्यात आहे.याच काळात वीज वितरण कंपनीकडून भार नियमन म्हणजेच लोड शेडींग करण्यात येत असल्यामूळे या महत्वाच्या उत्सवाच्या काळातच नागरिकांना प्रचंड त्रास व अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने शुक्रवार (दि.८) रोजी आ.संदीप क्षीरसागर यांनी मा.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना निवेदन देत, जिल्हाभरात लोड शेडींग थांबवून नियमीत व अखंडीत वीजपुरवठा करण्यात यावा अशी मागणी केली होती या मागणीची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दखल  घेतली असून राज्यातील भारनियमन टाळण्यासाठी महावितरण ला  वीज खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली आहे.आ.क्षीरसागर यांनी केलेल्या मागणीचा उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार यांनी सारणी (आनंदगाव या.केज) येथील कार्यक्रमात जाहीर उल्लेख केला.आ.क्षीरसागर यांच्या मागणीवर व नागरिकांच्या महत्वाच्या अडचणीवर तात्काळ कार्यवाही केल्याबद्दल नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. मुस्लिम बांधवाच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व असलेला पवित्र रमजान महिना सुरू झाला आहे.३ एप्रिल ते ३ मे याकाळात पवित्र रमजान सण आहे.या महिनाभराच्या काळात सर्व मुस्लिम बांधव मस्जिदीमध्ये जाऊन नमाज पठण करत असतात.यासोबतच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंतीउत्सव १४ एप्रिल रोजी आहे, याचबरोबर हनुमान जयंती उत्सव हा १६ एप्रिल रोजी आहे परंतु हे उत्सव जिल्हाभरात संपूर्ण महिनाभर चालतात.जयंती उत्सवांच्या अनुषंगाने जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागामध्ये विविध सार्वजनिक कार्यक्रम आयोजित केले जातात.याच काळात जिल्ह्यात वीज वितरण कंपनीकडून भारनियमन म्हणजेच लोड शेडींग केली जात आहे.यामुळे या कार्यक्रमांना अडथळा निर्माण होत आहे.तसेच सध्या उन्हाची तीव्रता खूपच जास्त असल्यामुळे प्रचंड उष्णतेचा सामना नागरिकांना करावा लागत असल्याने वीजेचे भार नियमन बंद करून जिल्हाभरात नियमीत वीजपुरवठा करण्यात यावा अशी मागणी आ.संदीप क्षीरसागर यांनी शुक्रवार (दि.८) रोजी मा.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार बीड जिल्हा दौ-यावर असताना त्यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती.ही मागणी मान्य करत उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार यांनी तातडीने मंत्रालय स्तरावर बैठक आयोजित केली व महावितरण ला वीज खरेदी करण्यासाठी परवानगी देण्यात आली.सदरील बैठक ही मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.राज्यभरातील विजेच्या भार नियमनाचा प्रश्न सोडविण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल अतितातडीने उचलल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित दादा यांचे धन्यवाद देत असल्याच्या भावना जनतेमधून व्यक्त केल्या जात आहेत.दरम्यान बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या पुढाकारातून बीड जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यभरातील भार नियमन टळणार असून जनतेचा सद्यस्थितील सर्वात महत्वाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.संबंधित मागणीचे निवेदन देतांना राष्ट्रवादी-कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा.ना.जयंतराव पाटील,बीड व परभणी जिल्हा पालकमंत्री मा.ना.धनंजय मुंडे,आ.संजय दौंड,मा.आ.सय्यद सलीम, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अशोक डक, राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा