बीड स्पीड न्यूज
शुभम गिलची 59 चेंडूत तुफान फटकेबाजी; गुजरात टायटन्सचा पंजाब किंग्जवर 6 विकेटने विजय
IPL 2022 या हंगामात आज (8 एप्रिल) 16 व्या सामन्यात गुजरात टायटन्सने पंजाब किंग्जचा 6 विकेटने पराभव केला. गुजरातच्या या विजयात शुभमन गिल आणि राहुल तेवतियाने महत्त्वाची भूमिका निभावली. आयपीएलच्या या हंगामात हे दोन्ही संघ पहिल्यांदाच एकमेकांविरूद्ध लढले. मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात गुजरातने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या पंजाबने 20 षटकात 9 बाद 189 धावा केल्या. यानंतर गुजरातने 6 विकेट राखत अखेरच्या चेंडूवर षटकार लगावत 190 धावा केल्या आणि सामना जिंकला मयांक अग्रवाल 9 चेंडूत 5 धावा करून बाद झाला. त्याला हार्दिक पंड्याने बाद केलं. जॉनी बेयरस्टोने 8 चेंडूत 8 धावा केल्या. त्याला लोकी फर्गसनने बाद केलं. पंजाबला तिसरा झटका शिखर धवनच्या रुपात मिळाला. शिखर धवनने 30 चेंडूत 35 धावा केल्या. त्याला रशिद खानने बाद केलं. लियाम लिव्हिंगस्टोनने 27 चेंडूत 64 धावांची तुफानी खेळी केली. जितेश शर्माने 11 चेंडूत 23 धावांची खेळी केली. ओडेन स्मिथला तर आपलं खातही खोलता आलं नाही. तो पहिल्याच चेंडूवर तंबुत परतला. शाहरुख खानने 8 चेंडूत 15 धावा काढल्या. रबाडालाही एकच धाव करता आली, तर वैभव अरोराने 2 धावा केल्या. राहुल चहर आणि अर्शदीप सिंह नाबाद राहिले. चहरने 14 चेंडूत 22 धावा, तर अर्शदीपने 5 चेंडूत 10 धावा केल्या.
गुजरात टायटन्सची फलंदाजी
190 धावांचा पाठलाग करायला मैदानात उतरलेल्या गुजरात टायटन्सकडून शुभमन गिलने 59 चेंडूत तुफान फटकेबाजी करत 96 धावा केल्या. साई सुदर्शनने 30 चेंडूत 35 धावा, तर हार्दिक पंड्याने 18 चेंडूत 27 धावा केल्या. मॅथ्यू वेडने 7 चेंडूत 6 धावा केल्या. हा सामना गुजरातच्या खिशात घालण्यात जेवढी मोठी भूमिका शुभमन गिलची राहिली तेवढीच मोठी भूमिका अखेरच्या दोन चेंडूत सामना फिरवणाऱ्या राहुल तेवतियाची राहिली. त्याने 3 चेंडूत 13 धावा केल्या. यातील 12 धावा अखेरच्या दोन चेंडूंवर विजयासाठी 12 धावा लागत असताना काढल्या.
0 टिप्पण्या