Subscribe Us

header ads

आज जयभीम महोत्सवात वक्तृत्व स्पर्धेसह व्याख्यान जयभिम महोत्सव : सहभाग नोंदविण्याचे समितीचे आवाहन

बीड स्पीड न्यूज 


आज जयभीम महोत्सवात वक्तृत्व स्पर्धेसह व्याख्यान
जयभिम महोत्सव : सहभाग नोंदविण्याचे समितीचे आवाहन

बीड / प्रतिनिधी-:बीडच्या जयभीम महोत्सवाने अवघ्या राज्याला एक आदर्श घालून दिला आहे. या जय-भीम महोत्सवात आज रविवार  (ता.10) एप्रिल रोजी सकाळी 11 ते 5 या वेळेत वक्तृत्व स्पर्धा आणि सायंकाळी 6 ते 10 या वेळेत व्याख्यान होणार आहे. सदरील वक्तृत्व स्पर्धा आणि व्याख्यानमाला बीड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे होणार आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती बीड यांनी केले आहे.बीडच्या जयभीम महोत्सवात दरवर्षी  विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्या अनुषंगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती बीड यांच्याकडून आज  रविवार  (ता.10) एप्रिल रोजी वक्तृत्व स्पर्धा आणि प्रसिद्ध साहित्यिक डॉ ऋषिकेश कांबळे यांचे भारतीय लोकशाहीचे भवितव्य या विषयावर व्याख्यान होणार आहे. सदरील व्याख्यानास आणि  वक्तृत्व स्पर्धेत मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन  डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती बीड यांनी केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा