Subscribe Us

header ads

डिपीतील स्पार्कींग ने लागलेल्या आगीमध्ये चार एकर ऊस स्पिंकलर,थिंबक,घरावरील पत्रे,बैलगाडी जळून खाक

बीड स्पीड न्यूज 


डिपीतील स्पार्कींग ने लागलेल्या आगीमध्ये चार एकर ऊस स्पिंकलर,थिंबक,घरावरील पत्रे,बैलगाडी जळून खाक


बीड/प्रतिनिधी-:धारुर तालुक्यातील तेलगाव येथे गावाच्या पश्चिमेस नंदणी धर्मराज बोरचाटे,धर्मराज बळीराम बोरचाटे गट नं.२५६ या शेतकऱ्यांचा ऊस जळून खाक झाला.तसेच ठिंबक पुर्ण  बॉक्स,स्पिंकलर चा ऊसामध्ये ठेवलेले पुर्ण बॉक्स तसेच शेतामधील घरावरील पत्रे हि जळून खाक झाली.रमेश लिंबाजी सांवत यांची वळई ३००० कडबा पेड्या,बैलगाडी जळून खाक झाली.तसेच त्यांचे शेजारील गणपत लिबांजी सावंत यांच्या२०००वळई च्या पेंड्या जळून खाक झाल्या.डिपीच्या स्पार्किंग ने लागलेल्या आगीत पूर्णपणे ऊस,स्पिंकलर,वळई,घरावरील पत्रे जळून खाक झाले आहेत.माजलगाव सहकार साखर खारकाना सुंदर नगर 

तेलगाव या कारखाण्या कडुन तात्काळ ऊस नेणार असल्याचे सांगितले जात आहे.डि पी स्पार्कींग ने लागलेल्या आगीमध्ये नंदणी बोरचाटे,धर्मराज बोरचाटे,रमेश सांवत,गणपत सांवत या शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे.या नुकसानीचा पंचनामा महावितरण विभागाने केलेला आहे.तरी या शेतकर्यांना महावितरण विभागाने लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. ऊस तोडणी उशीर होत असल्याने अश्या ऊस जळून राख होण्याच्या घटनेत ही धारूर तालुक्यात वाढ होत आहे.धारूर तालुक्यातील दिवसेंदिवस उसाचा प्रश्न गंभीर होत आहे.ऊस तोडणीला येऊनही कारखाने नेत नसल्याने शेतकरी अगोदरच हैराण झालेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये उभे ऊस जळण्याचे ही प्रमाण मोठ्या  प्रमाणात वाढले आहेत.अशा या घटणेमुळे शेतकरी राजा हतबल  झालेला दिसत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा