Subscribe Us

header ads

भोंग्याच्या राजकारणाला बळी पडू नका !!बंधूभाव अबाधित ठेवण्यासाठी जनजागृती:बाळासाहेब मस्के

बीड स्पीड न्यूज 



भोंग्याच्या राजकारणाला बळी पडू नका !!

बंधूभाव अबाधित ठेवण्यासाठी जनजागृती:बाळासाहेब मस्के

बीड / प्रतिनिधी-:महाराष्ट्रात सध्या भोंग्याच्या वादग्रस्त विधानानंतर सामाजिक वातावरण दूषित होण्याचे संकेत निर्माण झालेले आहेत. समाजमधला मैत्रीपूर्ण सलोखा टिकून रहावा यासाठी  दैनिक पुण्यभूमीचे संपादक तथा बीएम प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब मस्के यांनी गेवराई तालुक्यातील काही गावात जनजागृती अभियान सुरु केले आहे. या अभियानातून भोंग्याच्या राजकारणाला बळी पडू नका असा नारा दिला जात आहे. समाजातील बंधूभाव अबाधित ठेवण्यासाठी या जनजागृती अभियानाची मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे बाळासाहेब मस्के यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.बीएम प्रतिष्ठान नेहमीच समाजामध्ये चांगल्या गोष्टी राबवित आलेले आहे. त्या अनुषंगाने आता भोंग्याच्या राजकारणाला बळी पडू नका या महत्वाच्या विषयावर जनजागृती अभियान सुरु केले आहे.  बंधू आणि भगिनींनो सर्वप्रथम आपण एक भारतीय आहोत. त्यामुळे आपण सर्वानी एकमेकांशी बंधूभावनेने राहिले पाहिजे. कारण भारतीय संविधान आपल्याला माणूस म्हणून जगायला शिकविते. हा महाराष्ट्र छत्रपती, शाहू, फुले, 

आंबेडकर या महापुरुषांच्या विचारधारेचा आहे. तसे पहिले गेले तर भारतीय संविधानातील कलम १५ नुसार देशातील सर्व नागरिक एकसमान आहेत. कलम १६ नुसार कोणत्याही व्यक्तीला धर्म, जात, लिंग आणि जन्मठिकाणावरून भेदभाव करता येणार नाही.  कलम २३ नुसार प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार देण्यात आलेला आहे. प्रत्येकाला आपली संस्कृती जपण्याचा अधिकार आहे. तसेच कोणत्याही धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. त्यामुळे समाजातले वातावरण बंधुभावाचे आणि मैत्रीपूर्ण रहावे. यासाठी आपण सर्वानी प्रयत्न केले पाहिजेत. या देशाची अखंडता एकमेव संविधानामुळे अबाधित व टिकून आहे. त्यामुळे इथली सर्व माणसे त्यांच्या धर्म, परंपरा जपत असताना एक चांगला नागरिक होऊन त्याला पाठबळ देऊयात आणि भोंग्याच्या राजकारणाला बळी पडू नका असा संदेश घराघरात देऊयात. असे म्हणत  दैनिक पुण्यभूमीचे संपादक तथा बीएम प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब मस्के यांनी जनजागृती अभियान सुरु केले आहे. त्यांच्या या अभियानामुळे समाजातले वातावरण मैत्रीपूर्ण राहणार आहे. त्यामुळे बाळासाहेब मस्के यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा