Subscribe Us

header ads

बालविवाह रोखण्यासाठी चाईल्ड लाईच्या 1098 क्रमांकावर माहिती देण्याचे आवाहन

बीड स्पीड न्यूज 


बालविवाह रोखण्यासाठी चाईल्ड लाईच्या 1098 क्रमांकावर

माहिती देण्याचे आवाहन

 

बीड, दि. 28  अध्यक्ष राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग नवी दिल्ली यांचे दि. 07/04/2022 चे पत्र. अक्षय तृत्तीया हा दिवस दि.03 मे 2022 रोजी आहे.  या दिवशी  भारतातील काही भागात मोठ्या प्रमाणात बाल विवाह आयोजित केले जातात. बाल विवाह प्रतिबंधक कायदा 2006 हा संपुर्ण महाराष्ट्रामध्ये लागु करण्यात आलेला आहे. त्यानुसार बालविवाह आयोजित करणे हा अजामिन पात्र गुन्हा आहे.  बीड जिल्ह्यामध्ये  देखील मोठ्या प्रमाणावर बालविवाह होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून नागरी संस्था, गावातील सरपंच, पोलीस पाटील, बालविवाह प्रतिबंधक अधिकारी, बाल कल्याण समिती, पोलीस विभाग, अंगणवाडी सेविका इत्यादींनी सतर्क राहून अक्षय तृत्तीया या सनाच्या दिवशी बीड जिल्ह्यात बालविवाह होणार नाहीत याबाबत वरील सर्व यंत्रणेने सतर्क राहून बालविवाह रोखण्याबाबत प्रभावी पणे कार्यवाही करावी. एखाद्या ठिकाणी बालविवाह होत असल्याबाबतची माहिती चाईल्ड लाईन बीड 1098 या टोल फ्री क्रमांकावर नागरिकांनी द्यावी. सदरील बालविवाह होत असल्याबाबत माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. नागरिकांनी कोणतीही भिती न बाळगता होणारे बालविवाह रोखण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, बीड यांनी केलेले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा