Subscribe Us

header ads

विवाहितेवर दोघा नराधमांचा सामूहिक बलात्कार!

  बीड स्पीड न्यूज 

विवाहितेवर दोघा नराधमांचा सामूहिक बलात्कार!


परळी/ प्रतिनिधी-:  परळी तालुक्यातील मिरवट येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 22 वर्षांच्या विवाहीत महिलेवर बलात्कार करण्यात आला. दोघा नराधमांनी बलात्कार केल्याचा खळबळजनक घटना समोर आल्यानंतर एकच संत व्यक्त केला जातो आहे.शेत आखाड्यावर कामावर असलेल्या महिलेवर दोघांनी अत्याचार केल्याची घटना बुधवारी तालुक्यातील मिरवट येथे उघडकीस आली आहे. याबद्दल कुणाला सांगितलं तर तुला आणि कुटुंबाला जीवे मारु अशी धमकीही पीडितेला देण्यात आली होती.याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी सज्जन मुकिंदा तिडके ( रा भोगलवाडी तालुका धारूर ) व अंगद केशव भदाडे ( रा मिरवट तालुका परळी) या दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.याबाबतची माहिती अशी की, परळी तालुक्यातील मिरवट येथील शेत आखाड्यावर एक कुटूंब कामावर आहे. बुधवारी आखाड्यावरील घरात महिला एकटी होती. ही संधी साधत सज्जन तिडके आणि अंगद भदाडे याने घरात घुसून जीवे मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार केला. बुधवारी रात्री महिलेच्या तक्रारीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात सज्जन तिडके व अंगद भदाडे या दोघांविरुद्ध बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, गुरुवारी सकाळी दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती मुंडे हे करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा