Subscribe Us

header ads

खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेने जयभिम महोत्सवास सुरुवात जयभिम महोत्सव : सीईओ अजित पवारांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन

बीड स्पीड न्यूज 


खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेने जयभिम महोत्सवास सुरुवात

जयभिम महोत्सव : सीईओ अजित पवारांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन


बीड प्रतिनिधी-: बीडच्या जय-भीम महोत्सवाने अवघ्या राज्याला आदर्श घालून दिला आहे.त्या अनुषंगाने भारतरत्न डॉ.आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त, यंदा जयंती उत्सव समितीकडून 1 एप्रिल ते 12 एप्रिल या कालावधीत भव्य खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवार (ता.१)  रोजी जिल्हा परिषद सीईओ अजित पवार, युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे, महावितरणचे अधीक्षक कोलप, सत्यशोधक ओबीसी परिषदचे अध्यक्ष संदीप उपरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अमरसिंग ढाका, गणेश वाघमारे, अशोक वाघमारे, राजू जोगदंड,प्रमोद शिंदे यांची उपस्थिती होती. 

या स्पर्धेच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजय सवाई, संचलन प्रा. बाळासाहेब गव्हाणे, आभार रवी वाघमारे यांनी केले. दरम्यान शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे सुरु असलेल्या या भव्य खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा क्रीडा प्रेमींनी आनंद घ्यावा असे आवाहन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती बीड यांनी केले आहे. या स्पर्धेत बाजी मारणाऱ्या संघांना प्रथम बक्षीस 31 हजार रुपये आणि शिल्ड, द्वितीय बक्षीस 21 हजार रुपये आणि सिल्ड, तृतीय बक्षीस अकरा हजार रुपये आणि शिल्ड इतर बक्षीस प्लेअर ऑफ द सिरीज, प्लेअर ऑफ दि मॅच, बेस्ट बॅस्टमन आणि बेस्ट बॉलर आदी बक्षिसे दिली जाणार आहेत. त्यामुळे 1 एप्रिल ते 12 एप्रिल या कालावधीत भव्य खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांचा क्रीडा प्रेमींनी आनंद घ्यावा असं आवाहन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती बीड यांच्याकडून करण्यात आले आहे.



विभागातून क्रिकेटचे ३२ संघ दाखल

भारतरत्न डॉ.आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या  भव्य खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत विभागातून तब्ब्ल ३२ क्रिकेट संघ दाखल झाले आहेत. अशी माहिती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती बीड यांनी दिली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा