Subscribe Us

header ads

जानीवांचे कृतीत रुपांतर करुन कीर्तिवान विद्यार्थी घडवण्याचे सामर्थ्य शिक्षकांमध्ये असते : गणेश मैड

बीड स्पीड न्यूज 


जानीवांचे कृतीत रुपांतर करुन कीर्तिवान विद्यार्थी 
घडवण्याचे सामर्थ्य शिक्षकांमध्ये असते : गणेश मैड

प्रतिनिधी | बीड -: शिक्षक हा शब्द अादरार्थी अाहे. त्याचबराेबर जी व्यक्ती शिक्षक म्हणून कार्यरत असते तेंव्हा ती व्यक्ती एकटी स्वत:पर्यंत मर्यादीत नसते. शिक्षक व्यक्ती महिला असाे वा पुरूष ते समाजासाठी समर्पीत असतात. त्यांच्यावर स्वत:च्या कुटूंबाप्रमाणेच समाजला घडवण्याची जबाबदारी असते. दैनंदीन जीवन चांगले अाणि भविष्याचा वेध घेण्याचे काैशल्य हे शिक्षकांच्या बुध्दीमत्तेमध्ये असते. जानीवांचे कृतीत रुपांतर करुन 

कीर्तिवान विद्यार्थी घडवण्याचे सामर्थ्य शिक्षकांमध्ये असते तसेच कार्य ट्विंकल इंग्लिश स्कूलच्या शिक्षकांकडून घडत असल्याचा अभिमान अाणि अानंद वाटताे, असे भावनिक उद‌्गार संस्थाचालक गणेश मैड यांनी व्यक्त केले. शहरातील शिवाजनीगर येथील ट्विंकल इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षकांचा कार्य गाैरव सन्मान कार्यक्रमाचे अायाेजन करण्यात अाले. यावेळी संस्थाचालक  गणेश मैड बाेलत हाेते. कार्यक्रास प्रमुख 

पाहुणे म्हणून दैनिक दिव्य मराठीचे पत्रकार रवी उबाळे, दैनिक झुंजार नेता चे पत्रकार अक्षय केंडे उपस्थित हाेते. व्यासपीठावर संस्थाचालक गणेश मैड, संचालक काेमात भास्करण‌्, प्राचार्य दीपक झा उपस्थित हाेते. संस्थाचालक मैड म्हणाले, ट्विंकल इंग्लिश स्कूलचा विस्तार बीड शहरामध्ये शिवाजीनगर शाखा, शाहुनगर शाखा अाणि मुख्य शाखा उत्तमनगर अशा तीन ठिकाणी झालेला अाहे, हे यश शिक्षक  अाणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या टीमचे अाहे. त्यांच्या मेहनतीच्या बळावर विद्यार्थी घडत अाहेत, त्यातून स्कुलचा दर्जाही वृध्दींगत हाेत अाहे. पत्रकार केंडे म्हणाले, अाजची सामाजिक परिस्थिती ही 

गंभीर अाणि चिंताजनक निर्माण हाेत अाहे. त्यामध्ये पालकांपुढे पुढीची पिढी असणारे मुले यांच्यावर संस्कार व शिक्षीत करण्याची जसे अाव्हान अाहे त्याच प्रमाणे शिक्षकांवर भावी पिढी निर्माण करण्याची डाेंगरा एेवढे माेठे अाेझे अाहे. कराेनाच्या अडचणीच्या काळात येथील शिक्षकांनी जे कार्य केले पुढील काळातही यापेक्षा अधिक गती बराेबरच क्षमतेने करतील, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.पत्रकार उबाळे म्हणाले, जग हे थांबू शकते हे मनुष्याच्या डाेळ्यांना न दिणाऱ्या लहानशा विषाणुने दाखवून दिले. त्या कराेना संकाटात स्वत:ची काळजी घेत जीवनामन जगण्याचा प्रयत्न मानवाने केला. दरम्यान मुलांच्या शिक्षणासाठी प्रत्येक शिक्षकाने संस्थाचालकांच्या निर्देशाचे पालन करत ज्ञानदान अाॅनलाईन पध्दतीने सुरू ठेवले हे कार्य पालकांसाठी प्रेरणादायी ठरले अाहे. कराेना संकट असाे किंवा इतरवेळी कुटूंब प्रमुखाच्या निर्णयाला समती देत सर्व 

सदस्य कार्यरत असतात त्याच प्रमाणे ट्विंकल इंग्लिश स्कूलचे कुटूंबप्रमुख म्हणून असणारे संस्थाचालक मैड यांच्या निर्णयाचे स्वागत करत त्याचे पालन करुन शिक्षकांना येत असलेल्या अडचणीला ताेंड देत अाॅनलाईन ज्ञान दिले. त्याच कार्याचा अाज गाैरव हाेत अाहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. काेराेना महामारीच्या संकटावर मात करण्यासाठी संपूर्ण जग दाेन हात करत हाेते. यात अापणही मागे नव्हताे. तशा दाेन वर्षांच्या काळातही अापले कर्तव्य अाणि विद्यार्थी यांच्या शिक्षणासाठी अताेनात मेहनत घेऊन ट्विंकल इंग्लिश स्कूलच्या शिक्षकांनी माैलीक कार्य केले, त्यांचा कार्याचा गाैरव म्हणून सर्व शिक्षकांचा भेटवस्तू व काैतुकाची थाप देण्याचा सन्मान साेहळा स्कुलच्यास्तरावर घेण्यात अाला, अशी माहिती ट्विंकल इंग्लिश स्कूलचे संचालक काेमात भास्करण‌् यांनी प्रस्ताविकात दिली.  यावेळी ४२ महिला शिक्षक, ६ पुरुष शिक्षक तसेच ९ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात अाला.  सुत्रसंचालन व अाभार प्राचार्य दीपक झा यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा