Subscribe Us

header ads

महामानवाच्या अभिवादनास लोटला जनसागर जयभिम महोत्सव : मोठ्या हर्ष आनंदाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी



बीड स्पीड न्यूज 



महामानवाच्या अभिवादनास लोटला जनसागर

जयभिम महोत्सव : मोठ्या हर्ष आनंदाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

समता ज्योत काढून मानवतेचा संदेश; मिरवणुकीत शहर दुमदुमले

मिरवणुकीत काही प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात



बीड / प्रतिनिधी-:डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती भारतातच नव्हे तर अन्य देशातही मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. त्या अनुषंगाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 131 व्या जयंती बीडमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. आंबेडकरी जनतेकडून गुरुवार (ता.14) रोजी  बीड शहरातील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पंचशील ध्वज फडकावून त्रिशरण पंचशील ग्रहण करून देत, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. दरम्यान जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, प्रभारी पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार, युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष पप्पु कागदे, जिल्हाधिकारी प्रसन्ना लुध, महावितरण व्यवस्थापक रवींद्र कोलप,समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी, सार्वजनिक जयंती उत्सव समिती आणि आंबेडकरी जनसमुदायाकडून महामानव  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने जयंती साजरी करण्यात आली. रात्री मिरवणुकीत काही अनुश्चित  प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
दरवर्षी सार्वजनिक जयंती उत्सव समितीकडून मोठ्या उत्साहात डॉ.बाबासहेब आंबेडकर यांची जयंती विविध कार्यक्रमांनी आठवडाभर साजरी करण्यात येते. मात्र गेल्या दोनवर्षांपासून कोरोनामुळे जयंती साजरी झाली नव्हती. त्यामुळे यंदा अतिशय विविध उपक्रम राबवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. भारतीय बौद्ध महासभेचे पंचशील ध्वज 

फडकावून पंचशील त्रिशरण घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभिवादन केले.यावेळी प्रा. प्रदीप रोडे, संदीप उपरे, माजी आ. राजेंद्र जगताप, सुशीलाताई मोराळे,अशोक हिंगे,गणेश वाघमारे, अजिंक्य चांदणे, विष्णू वाघमारे, केशव आठवले, अजय सवाई, राजू जोगदंड, किसन तांगडे,सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे उद्धव बनसोडे,अरुणाताई आठवले, मनोज वाघमारे, कैलास वीर, किरण बनसोडे, अरुणथ वीर, संगीताई वाघमारे,संतोष गायकवाड, किशोर वडमारे, प्रमोद शिंदे, अभय मगरे, हर्षद वडमारे, दिनकर जोगदंड,राजेश शिंदे, यांच्यासह अविनाश जोगदंड, प्रभाकर चांदणे, अशोक वाघमारे, प्रा. बाळासाहेब गव्हाणे, बबन वडमारे, प्रमोद शिंदे, अभय मगरे, पप्पू जोगदंड,धम्मानंद  पारवे, बाळासाहेब जोगदंड, मिलिंद पोटभरे, पप्पू वाघमारे, मायाताई मिसळे, नाना कांबळे, पिंटू गव्हाणे, बंडू निसर्गंध, विलास जोगदंड, अजय सरवदे, अशोक ठोकळ, अशोक वक्ते यांच्यासह भीम जनसमुदाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होता.



शहरवासियांचे वेधले लक्ष

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131  व्या जयंतीत आंबेडकरी जनता पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून सहभागी झाली होती. भारतीय बौद्ध  महासभेच्या   शिस्तप्रिय रॅलीने आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या जयघोषणे शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले. ही  रॅली छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या पुतळ्यास अभिवादन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापाशी पोहचली. याठिकाणी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी अलोट जनसागर लोटला  होता.




समता ज्योत काढून मानवतेचा संदेश

अवघ्या राज्याला आदर्श घालून दिलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमीत्त दरवर्षी  प्रमाणे याहीवर्षी बुधवार (ता. १३) रोजी मध्यरात्री समता ज्योत रॅली काढून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून मानवतेचा संदेश देण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीने ही शान्ति पथाच्या मार्गाने काढून एक चांगला पायंडा पडला आहे.


मिरवणुकीत शहर दुमदुमले

बीड शहरातील सर्व सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या रॅली छत्रपती शिवाजी  महाराज यांच्या पुतळ्यापाशी एकत्रित येऊन, सजवलेल्या रथातून मोठ्या हर्ष आनंदाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विविध प्रतिमांची भव्य मिरवणूक शहरातून काढण्यात आली. या मिरवणुकीमुळे बीड शहर दुमदुमले होते.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा